शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमधील 34 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची आज नोकरी जाणार; 'या' कारणामुळे सरकारने उचलली कठोर पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:55 IST

Care homes in England : 'द सन' च्या रिपोर्टनुसार, नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) आकडेवारीनुसार एकूण 34,000 फ्रंट लाइन वर्कर्सना कामावरून कमी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

लंडन : ब्रिटनमधील (Britain) 30,000 हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून हे आरोग्य कर्मचारी बेरोजगार होतील. दरम्यान, हे असे आरोग्य कर्मचारी आहेत, ज्यांनी अद्याप कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतलेली नाही. याशिवाय, ज्यांनी कोरोना लसीचा फक्त एकच डोस घेतला आहे, त्या केअर होम कर्मचाऱ्यांनाही कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

'द सन' च्या रिपोर्टनुसार, नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) आकडेवारीनुसार एकूण 34,000 फ्रंट लाइन वर्कर्सना कामावरून कमी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये वैद्यकीय कारणांचा हवाला देत लस घेण्यास नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य सचिव साजिद जाविद  (Sajid Javid) म्हणाले की, रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हे पाऊल उचलले आहे. त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. Deadline वाढवण्याच्या मागणीला नकारलसीकरणाची अंतिम मुदत एप्रिलपर्यंत वाढवावी, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी (Health Workers) केली होती. मात्र, सरकारने काल आरोग्य कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य करण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत असताना, सरकारच्या या निर्णयामुळे हिवाळ्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता भासू शकते.

'सरकारने विश्वासघात केला'बोरिस जॉन्सन सरकारच्या या निर्णयामुळे आरोग्य कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लस न घेतल्यामुळे नोकरी गमावलेल्या डेव्ह केली (Dave Kelly)यांनी सांगितले की, कोरोनाच्या सुरुवातीला कोणत्याही संरक्षणाशिवाय जीव वाचवणाऱ्या शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला आहे. तसेच, केली म्हणाली, 'हे फ्रंट लाइन वर्कर्स होते, त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांवर उपचार केले. मात्र, सरकार एका झटक्यात सर्व काही विसरले.'

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या