तुर्कस्थानमध्ये कारबॉम्बचा स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 120हून अधिक जखमी

By Admin | Updated: August 18, 2016 17:08 IST2016-08-18T17:08:46+5:302016-08-18T17:08:46+5:30

तुर्कस्थानमधल्या पोलीस मुख्यालयाबाहेर कार बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Carbom explosion in Turkistan, 3 killed, more than 120 injured | तुर्कस्थानमध्ये कारबॉम्बचा स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 120हून अधिक जखमी

तुर्कस्थानमध्ये कारबॉम्बचा स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 120हून अधिक जखमी

ऑनलाइन लोकमत
टर्की, दि. 18 - तुर्कस्थानमधल्या पोलीस मुख्यालयाबाहेर कार बॉम्बस्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या कार बॉम्बस्फोटात जवळपास 120हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचा-यांचाही समावेश आहे.
या हल्ल्याच्या मागे कुर्दिश वर्कर्स पार्टी (पीकेके)चा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
डोगन न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 11च्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. बॉम्बस्फोटानंतर परिसरात गोळीबाराचाही आवाज आला. कार बॉम्बस्फोटात आजूबाजूच्या भरपूर इमारतींचं नुकसान झालं आहे.

Web Title: Carbom explosion in Turkistan, 3 killed, more than 120 injured