कारमध्ये स्फोट, महिला खासदार पतीसह ठार

By Admin | Updated: November 28, 2015 22:09 IST2015-11-28T22:09:04+5:302015-11-28T22:09:04+5:30

ग्लॅमरस रशियन महिला खासदार पतीसह कारमध्ये प्रणय करीत असताना बॉम्बस्फोट होऊन दोघेही मारले गेले. कारमध्ये दोघांचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

A car bomb, and a woman MP with a husband killed | कारमध्ये स्फोट, महिला खासदार पतीसह ठार

कारमध्ये स्फोट, महिला खासदार पतीसह ठार

मॉस्को : ग्लॅमरस रशियन महिला खासदार पतीसह कारमध्ये प्रणय करीत असताना बॉम्बस्फोट होऊन दोघेही मारले गेले. कारमध्ये दोघांचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
३० वर्षीय ओकसाना बोब्रोवस्क्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पक्ष युनायटेड रशियाच्या सदस्य होत्या. त्या सायबेरियातील सर्वांत मोठे शहर नोवोसिबिर्स्क येथे झालेल्या बॉम्बस्फोटात मारल्या गेल्या. ओकसाना व त्यांचे पती निकिता रात्री उशिरा कारमध्ये प्रणय करीत असतानाच स्फोट झाला.
ओकसाना यांच्या पतीनेच ईर्षेतून हा स्फोट घडवून आणला असावा, अशी शंका पोलिसांना आहे. या घटनेपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. श्रीमंत प्रियकरामुळे पत्नी आपणास धोका देत असल्याचा आरोप निकिता यांनी केला होता. दरम्यान, महापौरांनी ही दहशतवादी घटना नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: A car bomb, and a woman MP with a husband killed