विमानाचा फ्लाईट डाटा रेकॉर्डर हस्तगत
By Admin | Updated: January 13, 2015 00:12 IST2015-01-13T00:12:47+5:302015-01-13T00:12:47+5:30
पाणबुड्यांनी एअर एशिया विमानाचा महत्त्वपूर्ण फ्लाईट डाटा रिकॉर्डर सोमवारी जावा समुद्रातून हस्तगत केला असून याद्वारे विमान दुर्घटना नेमकी कशी घडली

विमानाचा फ्लाईट डाटा रेकॉर्डर हस्तगत
जकार्ता/सिंगापूर : पाणबुड्यांनी एअर एशिया विमानाचा महत्त्वपूर्ण फ्लाईट डाटा रिकॉर्डर सोमवारी जावा समुद्रातून हस्तगत केला असून याद्वारे विमान दुर्घटना नेमकी कशी घडली याचा माग काढता येऊ शकणार आहे. दरम्यान, पाण्यावर आदळल्यानंतर दाबात वेगाने बदल होऊन विमानाचा स्फोट झाला, असे इंडोनेशियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ब्लॅकबॉक्समध्ये समावेश असलेल्या कॉकपीट व्हाईस रिकॉर्डरचाही छडा लावण्यात आला असून ते फ्लाईट डाटा रिकॉर्डरपासून ३० मीटर अंतरावर आहे. कॉकपीट व्हाईस रिकॉर्डरचा छडा लागला असला तरी ते अद्याप पाण्याबाहेर काढण्यात आलेले नाही. हा रिकॉर्डर विमानाच्या एका पंखाखाली असण्याची शक्यता असून पंखाचे वजन खूप असते. त्यामुळे आम्ही हा रिकार्डर आज मिळवू शकलो नाही. त्याला पाण्याबाहेर आणण्यासाठी मंगळवारी मोहीम राबवली जाईल. मंगळवारी आम्ही हवेच्या दोन पिशव्यांचा वापर करणार आहोत, असे सुप्रियादी यांनी सांगितले. हे विमान समुद्रात कोसळले होते. (वृत्तसंस्था)