कॅनडाच्या दाम्पत्याने तिसऱ्यांदा जिंकली लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:32 IST2017-04-08T00:32:33+5:302017-04-08T00:32:33+5:30
नशीब बलवत्तर असणे म्हणजे काय? असा प्रश्न कुणाला पडला, तर त्याचे उत्तर आहे कॅनडाचे हे दाम्पत्य.

कॅनडाच्या दाम्पत्याने तिसऱ्यांदा जिंकली लॉटरी
टोरँटो : नशीब बलवत्तर असणे म्हणजे काय? असा प्रश्न कुणाला पडला, तर त्याचे उत्तर आहे कॅनडाचे हे दाम्पत्य. यांना एकदा, दोनदा नव्हे तर चक्क तिसऱ्यांदा लॉटरी लागली आहे. ही रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण ८२ लाख डॉलरची रक्कम विजेते हे दाम्पत्य सध्या चर्चेचा विषय आहे. बार्बरा आणि डगलस फिंक या दाम्पत्याने यापूर्वी १९८९ आणि २०१० मध्ये लॉटरीची रक्कम जिंकली होती. वेस्टर्न कॅनडा लॉटरीच्या वतीने सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीतील जॅकपॉट यात सर्वात मोठा होता. एडमॉन्टनमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याने सांगितले की, लॉटरीच्या पैशांचा उपयोग ते आपल्या मुलांसाठी करणार आहेत. यातील काही पैशांचा उपयोग ते स्वत:साठी करणार आहेत. डगलस फिंक यांनी सांगितले की, घर घेण्याची आणि पर्यटन करण्याची आपली योजना आहे. यापूर्वी १९८९ मध्ये १ लाख २८ हजार कॅनडा डॉलरची लॉटरी त्यांना लागली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या चार मित्रांत या पैशांची विभागणी केली होती.