शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"आता कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात नो एंट्री", खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 14:51 IST

Canada Temple Attack : कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी करणारा मोठा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : रविवारी कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात एका हिंदूमंदिरावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आता कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानवाद्यांनी हिंदूमंदिरांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने (CNCH)  मोठे पाऊल उचलले आहे. 

कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी करणारा मोठा निर्णय घेतला. कॅनडात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना हिंदू मंदिरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत खलिस्तानींवर कारवाई होत नाही आणि मंदिरांची सुरक्षा बळकट केली जात नाही, तोपर्यंत मंदिरांचा राजकीय हेतूने वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदू्सने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये आहे की, आज ब्रॅम्प्टनमधील गोर रोडवर असलेल्या हिंदू मंदिराला हिंसक घटनेदरम्यान खलिस्तान समर्थक आंदोलकांनी लक्ष्य केले. ज्यामुळे कॅनडातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आंदोलक मंदिराच्या मुख्य गेटवर जमले, बळजबरीने आवारात घुसले आणि मंदिराच्या सदस्यांवर शारीरिक हल्ला केला, ज्यामुळे समुदाय भयभीत झाला आहे.

हिंदू कॅनेडियन लोकांना टारगेट केलं जातंययाचबरोबर, हिंदू कॅनेडियन लोकांना टारगेट करून हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आले. हिंदूंवरील धोकादायक घटनांच्या मालिकेचे हे ताजे उदाहरण आहे. हिंदू धर्मस्थळांच्या संरक्षणासाठी मजबूत सुरक्षा उपायांसाठी समुदाय नेत्यांद्वारे वारंवार आवाहन करूनही, नेत्यांनी वाढत्या शत्रुत्वाचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.

नेत्यांना मंदिरात नो-एंट्रीदरम्यान, आजच्या हल्ल्यानंतर कॅनेडियन नॅशनल हिंदू कौन्सिल (CNCH) आणि हिंदू फेडरेशनने मंदिर नेते आणि हिंदू वकील गट यांच्या संगनमताने एक निर्णय घेतल्याचे प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. त्यानुसार, संपूर्ण कॅनडामधील हिंदू मंदिरे आणि संस्था यापुढे आता राजकारण्यांना मंदिराच्या सुविधांचा राजकीय उद्देश्यांसाठी वापर करू देणार नाहीत. राजकारणी कोणत्याही पक्षाशी संबंधीत असले तरीही ते भक्त म्हणून येऊ शकतात, मात्र जोपर्यंत ते खलिस्तानी अतिरेक्याचा मुद्दा सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंदिराच्या व्यासपीठावर प्रवेश मिळणार नाही.

नेमकं काय घडलंय कॅनडामध्ये?कॅनडातील हिंदू सभा मंदिरात रविवारी काही हिंदू भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार हिंदू भाविकांकडून करण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरातच तुफान हाणामारी झाली. या घटनेमध्ये काहीजण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आम्ही मंदिर परिसरात भारतीय उच्चायुक्त दर्शनासाठी येण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होतो, असे म्हणत सिख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेने हा हल्ला केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

टॅग्स :CanadaकॅनडाHinduहिंदूTempleमंदिरInternationalआंतरराष्ट्रीय