शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:18 IST

Justin Treduea, Nijjar Murder Case, Canada India Relationship: निज्जर हत्याकांडात भारतावर बिनबुडाचे आरोप करणारं जस्टीन ट्रुडो सरकार आता बॅकफूटवर

Justin Treduea, Nijjar Murder Case, Canada India Relationship: आपल्या मतपेटीच्या राजकारणामुळे भारतासोबतचे संबंध बिघडवणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता हळूहळू शांततापूर्ण भूमिका घेण्यास इच्छुक दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रुडो सरकारने भारताचा समावेश 'सायबर क्षेत्रातील धोकादायक देश' या यादीत केला होता. त्यावरून भारत-कॅनडा यांच्यातील संबंध अधिक तणावपूर्ण झाले होते. पण आता निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाचे नवे वक्तव्य समोर आले आहे. निज्जर हत्याकांडात भारत सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे. निज्जर हत्याकांडामध्ये भारताचे सर्वोच्च नेतृत्व सहभागी असल्याचा 'द ग्लोब अँड मेल'चा दावा होता. हा दावा कॅनडा सरकारने फेटाळून लावला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या वृत्तपत्राच्या या वृत्ताचे खंडन केले होते. कॅनडाची प्रसारमाध्यमे भारताची बदनामी करण्यासाठी मोहीम चालवत असल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता.

निज्जर हत्या प्रकरणात कॅनडा बॅकफूटवर

निज्जर हत्याकांडात कॅनडाचे सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले आहे. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेकवेळा आपली भूमिका बदलली. याआधीही कॅनडाने निज्जर हत्या प्रकरणात भारताविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कॅनडाने म्हटले होते. आम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे भारतावर आरोप केले होते. कॅनडाने सांगितले की, आम्ही भारतीय सुरक्षा एजन्सींना अधिक तपास करण्यास आणि आम्हाला सहकार्य करण्यास सांगितले कारण त्यावेळी आमच्याकडे केवळ गुप्तचर यंत्रणांची माहिती होती, कोणतेही ठोस पुरावे नव्हते.

कॅनडात झाली होती निज्जरची हत्या

गेल्या वर्षी १८ जून रोजी कॅनडातील सरे येथे हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारताने या प्रकरणी कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले. काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कॅनडाच्या सरकारने सप्टेंबर २०२३ पासून आमच्याशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. कॅनडाच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले मात्र अद्याप कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रुडो यांच्यावर मतपेटीच्या राजकारणासाठी केलेला प्रयत्न असा आरोप केला होता. त्यानंतर आता कॅनडाकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारत