कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात मंगळवारी घडलेल्या एका घटनेने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. एका व्यक्ताने घरातील दोन सदस्यांची हत्या केल्यानंतर जवळच्या शाळेत अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात एका महिला शिक्षिकेसह अनेक पाच निष्पाप विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वत:ही आत्महत्या केली. २०२० नंतरचा हा कॅनडातील सर्वात भीषण गोळीबार मानला जात असून, या घटनेने जगभरात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून हल्लेखोर व्यक्ती ट्रान्सजेंडर असल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जेसी वॅन रूटसेलार (वय, १८) असे या हल्लेखोर ट्रान्सजेंडरचे नाव आहे. मंगळवारी सकाळी जेसीने प्रथम आपल्या राहत्या घरी ३९ वर्षीय आई आणि ११ वर्षांच्या सावत्र भावाची गोळी झाडून निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिने टंबलर रिज येथील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एका ३९ वर्षीय महिला शिक्षिकेसह पाच निष्पाप विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ वर्षांच्या तीन मुली आणि १२ व १३ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या रक्तरंजित खेळानंतर जेसीने स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली.
धक्कादायक खुलासा
पोलीस कमांडर ड्वेन मॅकडोनाल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसी ही गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होती. तिच्या वाढत्या हिंसक प्रवृत्तीमुळे पोलीस यापूर्वीही अनेकदा तिच्या घरी चौकशीसाठी गेले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेसीचा शस्त्र परवाना संपलेला होता. नियमांनुसार तिची शस्त्रे जप्त करण्यात आली होती, परंतु काही तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे ती तिला पुन्हा सोपवण्यात आली. याच शस्त्रांचा वापर करून तिने आठ जणांची हत्या केली. तिने टम्बलर रिज येथील ज्या हायस्कूलमध्ये गोळीबार केला, त्याच शाळेत ती शिकली होती. चार वर्षांपूर्वी तिने तेथून शिक्षण सोडले. जुन्या आठवणी किंवा त्या काळातील काही वाद या हल्ल्यामागे असू शकतात का, याचा तपास पोलीस करत आहेत.
पंतप्रधानांकडून दुख व्यक्त; ७ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर
या घटनेनंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "हा कॅनडाच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस आहे. संपूर्ण देश पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. घटनेच्या निषेधार्थ आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकारी इमारतींवरील ध्वज सात दिवस अर्ध्यावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Web Summary : A transgender individual, Jaci Van Ruysevelaar, killed her mother, stepbrother, a teacher, and five students in a British Columbia school shooting before taking her own life. The attacker had mental health issues and her weapon permit was previously revoked.
Web Summary : कनाडा में एक ट्रांसजेंडर व्यक्ति, जेसी वैन रुइसेवेलार ने अपनी माँ, सौतेले भाई, एक शिक्षिका और पांच छात्रों को गोली मार दी और बाद में आत्महत्या कर ली। हमलावर मानसिक स्वास्थ्य समस्याओं से ग्रस्त था और उसका हथियार परमिट पहले रद्द कर दिया गया था।