शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 19:55 IST

Canada vs India, PM Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतावर विविध आरोप करताना दिसत आहेत.

Canada vs India, PM Justin Trudeau: कॅनडा आणि भारत यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही महिन्यांपासून तणावपूर्ण होताना दिसत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतावर विविध आरोप करताना दिसत आहेत. ट्रुडो यांनी लावलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर भारतीय परराष्ट्र विभागाने दिले आहे. असे असताना भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टीन ट्रुडो यांना आता कॅनडातूनच धक्का बसला आहे. एकीकडे कॅनडा सरकारच्या बिनबुडाच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत भारत सरकारने कडक कारवाई केली आहे, तर दुसरीकडे लिबरल पक्षाचे खासदार ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

कॅनडातील शार्लोट टाऊन येथील खासदार शॉन केसी यांनी सीबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रुडो यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मला माझ्या मतदारसंघातील लोकांकडून स्पष्ट संदेश मिळत आहेत की आता ट्रूडो यांच्या गच्छंचीची वेळ आली आहे. मीदेखील त्यांच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे.

ट्रुडो यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे!

लिबरल पक्षाच्या खासदारांपैकी एक असलेल्या सीन केसी यांनी म्हटले की मी स्पष्टपणे आणि ठणकावून सांगतोय की ट्रूडो यांची जाण्याची वेळ आली आहे. काळाच्या ओघात ही मागणी जोर धरत जाईल. ट्रुडो हे जनतेचे ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा. ट्रूडो यांनी गेल्या ९ वर्षांत कॅनडासाठी चांगले काम केले असले तरी आता मतदार ट्रुडोंना पसंत करत नाहीत, असे रोखठोक मतही त्यांनी मांडले.

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारत