शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाझी लोकांचा अड्डा बनलाय कॅनाडा...; आता भारताच्या या खास मित्रानंही जस्टिन ट्रूडोंना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 17:27 IST

यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नर्णय त्यांच्याच अंगाशी येताना दिसत आहेत. कॅनडाच्या संसदेत एका नाझी सैनिकाला सन्मानित करण्यात आले. यानंतर, ट्रुडो यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्थरावर टीका होत आहे. आता रशियानेही कॅनडाला फटकारले आहे. यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे.

कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष अँथनी रोटा यांनी 98 वर्षीय यारोस्लाव्ह हंका यांना 'वॉर हीरो' म्हणून संबोधले. यानंतर त्यांनी माफाही मागितली. मात्र कॅनडाच्या या कृतीमुळे रशिया नाराज झाला आहे. यासाठी कॅनडाला स्पष्टिकरण द्यावे लागेल, असे ओटावा येथे रशियन राजदूत स्टेपानोव्ह यांनी म्हटले आहे. ओलेग स्टेपानोव्ह यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी आर्मी युनिटसाठी लढणाऱ्या सैनिकाला सन्मानित केल्याबद्दल ट्रूडो यांच्यावर टीका केली आहे. स्पुतनिकच्या वृत्तानुसार, स्टेपानोव्ह यांनी रोटा यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. यासाठी त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे आणि पंतप्रधान कार्यालयाकडे स्पष्टिकरण मागीतले आहे.

भारतानंही फटकारलं -भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अल‍िपोव्ह यांनी लिहिले आहे की, 'कॅनडा युक्रेनिअन नाझिंसाठी केवळ एक सुरक्षित स्वर्गच राहणार नाही. उभे राहून एका माजी नाझी सैनिकाचा अशा पद्धतीने जय-जयकार करणे, सर्व काही सांगून जाते. देवाची कृपा आहे की, झेलेंस्की यांच्या आजोबांनी हे पाहिले नाही की, त्यांचा नातू काय बनला आहे.' तत्पूर्वी, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडाला ''दहशतवाद्यांसाठीचे एक सुरक्षित आश्रयस्थान," म्हटले होते. 

टॅग्स :russiaरशियाCanadaकॅनडाTerrorismदहशतवादJustin Trudeauजस्टीन ट्रुडो