ब्रिटनमध्ये पुन्हा कॅमेरुन सरकार
By Admin | Updated: May 9, 2015 02:11 IST2015-05-09T02:11:48+5:302015-05-09T02:11:48+5:30
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या हुजूर पक्षाला ब्रिटनच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून, निकाल त्रिशंकू लागतील हे निवडणूकपूर्व संकेत धुळीस मिळवत तो सर्वांत मोठा पक्ष ठरला

ब्रिटनमध्ये पुन्हा कॅमेरुन सरकार
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या हुजूर पक्षाला ब्रिटनच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून, निकाल त्रिशंकू लागतील हे निवडणूकपूर्व संकेत धुळीस मिळवत तो सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणूक निकालांनी आघाडीचे राजकारण संपुष्टात आणले आहे.
कॅमेरुन यांना ३२७ जागा
मिळाल्या असून, ६५० जागांच्या हाउस
आॅफ कॉमन्समध्ये त्यांनी निम्म्या जागांचा म्हणजेच साधारण बहुमताचा आकडा थोडक्यात पार केला आहे. ब्रिटनपासून स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पक्षाला आश्चर्यजनक
विजय मिळाला असून, ५९पैकी ५६ जागा मिळाल्या आहेत. २०१०च्या निवडणुकीत फक्त ६ जागा मिळवणाऱ्या या पक्षाने मोठीच उडी मारली आहे. पण मजूर पक्षाची पार निराशा झाली आहे.