ईदनिमित्त मशिदीत गेलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रथान अँथोनी अल्बानीज यांच्यासोबत मशिदीच्या परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्बानीज हे शुक्रवारी सिडनीतील मशिदीत गेले असताना जमावाने त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तसेच गेट आऊट अशा घोषणा देत त्यांना मशिदीबाहेर काढले. एवढंच नाही तर जमावाने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना कुत्रा म्हणून संबोधले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज ईदच्या नमाज निमित्त ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीक आणि गृहमंत्री टॉनी बर्क हे मशिदीत गेले होते. मात्र ते मशिदीत पोहोचल्यानंतर १५ मिनिटांच्या आतच जमाव संतप्त झाला. त्यांनी गेट आऊटच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच पंतप्रधानांचा उल्लेख नरसंहाराचे समर्थक असाही केला. ऑस्ट्रेलियन पंतप्रदानांनी गाझामधील युद्ध आणि इस्राइलबाबत घेतलेल्या भूमिकेवरून जमावाने या माध्यमातून संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर एक इसम ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा उल्लेख कुत्रा म्हणून करताना दिसत आहे.
परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच आयोजकांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं. मात्र परिस्थिती एवढी बिघडली की, एका सुरक्षा कर्मचाऱ्याने एका आंदोलकाला जमिनीवर पाडून बाहेर नेलं. त्यानंतर अल्बानीज आणि बर्क हे जेव्हा मशिदीबाहेर पडले तेव्हाही जमावाने त्यांचा पाठलाग करत घोषणाबाजी सुरूच ठेवली. मात्र तिथून बाहेर आल्यावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी हा कार्यक्रम खूपच सकारात्मक झाल्याची सारवासारव केली. तसेच ३० हजार जणांच्या जमावामधील केवळ काही जणच विरोध करत होते, असे सांगितले.
Web Summary : Australian PM Anthony Albanese faced protests at a Sydney mosque during Eid. Demonstrators chanted slogans, calling him a 'dog' and demanding he leave, due to his stance on the Gaza conflict and Israel. Albanese downplayed the incident, citing a positive event overall.
Web Summary : ऑस्ट्रेलियाई पीएम एंथनी अल्बानीज को सिडनी की एक मस्जिद में ईद के दौरान विरोध का सामना करना पड़ा। प्रदर्शनकारियों ने नारे लगाए, उन्हें 'कुत्ता' कहा और गाजा संघर्ष और इजराइल पर उनके रुख के कारण उन्हें छोड़ने की मांग की। अल्बानीज ने घटना को कम करके आंका।