शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

2 कोटी रुपयांमध्ये विकत घ्या अख्खे गाव! पर्यटन प्रकल्प तोट्यात; परिसर पडला ओस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 08:42 IST

village : स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या.

माद्रिद :  स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. मात्र २०००च्या दशकात युरोझोनमधील आर्थिक संकटांमुळे त्याचा हा प्रकल्प तोट्यात गेला. आता हे गाव पूर्णपणे ओस पडलेले आहे. तिथे ४४ घरे, एक हॉटेल, एक चर्च, एक शाळा, पालिकेचा जलतरण तलाव, सुरक्षा रक्षकांची इमारत अशा सोयी आहेत. हे गाव वसविणाऱ्या मालकाची रॉयल इन्व्हेस्ट नावाची कंपनी आहे.  

युरोपातील तत्कालीन बिकट आर्थिक संकटामुळे गाळात गेलेला गावातील पर्यटन प्रकल्प कधीतरी उभारी घेईल, अशी त्याला अजूनही आशा आहे. त्यामुळे सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव कोणीतरी बड्या उद्योजकाने विकत घेऊन तेथील पर्यटनाला नव्याने झळाळी द्यावी, अशी या गावच्या मालकाची अपेक्षा आहे.

गाव का ओस पडले?१९५० साली इबरड्युरो या वीजनिर्मिती कंपनीचे कर्मचारी येथे एक जलाशय बांधत होते. त्यावेळी हे कर्मचारी गावांतील घरांमध्ये राहत होते. मात्र जलाशयाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते दुसरीकडे स्थलांतरित झाले व हे गाव ओस पडले. त्यानंतर ते गाव रॉयल इन्व्हेस्ट कंपनीच्या मालकाने विकत घेतले व त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरल्याने गाव ओसच राहिले.

विकत घेण्यासाठी जगभरातून मागणीnसॉल्टो दी कॅस्ट्रो हे अख्खे गाव २ लाख २७ हजार युरो म्हणजे २ कोटी १६ लाख ८७ हजार ८३१ रुपयांना विकत मिळेल, अशा जाहिराती स्पेन, युरोपमधील मालमत्ताविषयक वेबसाईटवर झळकल्या आहेत. nया जाहिरातीच्या रिटेल पेजला ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाव विकत घेण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स, रशियातील सुमारे ३०० उद्योजकांनी रस दाखविला आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय