वॉशिंग्टन - जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क १४ व्या वडील बनले आहेत. मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीची जबाबदारी सांभाळणारी शिवोन जिलिस यांनी मस्क यांच्यासोबतच्या त्यांच्या चौथ्या मुलाची माहिती सार्वजनिक केली. एलनशी बोलल्यानंतर मला माझी मुलगी आर्केडिया हिच्या वाढदिवसानिमित्त आमचा मुलगा शेल्डन लिकरगस याच्याबद्दल सांगताना आनंद होतोय असं शिवोन जिलिस यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं.
शिवोन जिलिस यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, शेल्डन एक हुशार मुलगा असून त्याचे हृदय सोन्यासारखं आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं त्यांनी भावना व्यक्त केली. मस्क यांनीही हार्ट इमोजी दाखवून त्यावर प्रतिसाद दिला. शिवोन जिलिस यांनी मस्क यांच्यासोबत आयवीएफ तंत्रज्ञानाद्वारे २०२१ साली स्ट्रायडर आणि एजुर यांना जन्म दिला होता. त्यानंतर २०२४ साली या दोन्ही जोडप्याने तिसरी मुलगी आर्केडिया यांना जन्म दिला.
आर्केडियाच्या जन्मानंतर अनेक महिन्यांनी मस्क यांनी त्याबाबत माहिती सार्वजनिक केली. शिवोन जिलिस या मस्क यांची कंपनी न्यूरालिंक यात एआय एक्सपोर्ट प्रमुखपदावर आहेत. मस्क यांची पहिली पत्नी कॅनडाची मूळ लेखिका जस्टिन विल्सन या असून त्यांना ५ मुले आहेत. ज्यातील जुळे ग्रीफिन-विवियन आणि काइ, सॅक्सन व डेमियन यांचा समावेश आहे. मस्क आणि विल्सन यांच्या पहिला मुलगा नेवादा जन्मापासून १० आठवड्यातच आजाराने मृत्यूमुखी पडला. २०२० मध्ये गायिका ग्रिम्सने मस्क यांच्या आणखी ३ मुलांना जन्म दिला. ही मुले सरोगेसीतून झाली होती.
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून मस्क यांनी जागतिक लोकसंख्येत होणाऱ्या घटाबाबत चिंता व्यक्त केली होती. मानवी जीवनासाठी हा सर्वात मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं होते. अनेकदा कौंटुबिक वादामुळेही मस्क चर्चेत आले होते. मुलांच्या आरोग्याकडे ट्रम्प दुर्लक्ष करतात असं त्यांची पत्नी ग्रिम्सने आरोप केला होता. ५ महिन्यापूर्वी सोशल मिडिया इन्फ्लुन्सर एशले सेंट क्लेयरनेही मस्क यांच्या १३ व्या मुलाला जन्म दिल्याचं सांगितले होते. परंतु मस्क यांनी या दाव्याची पुष्टी केली नाही किंवा त्याचे खंडनही केले नव्हते. एशलेचं प्रायव्हेट चॅट लीक झाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला होता.