चीनमध्ये बस पेटवली, १७ प्रवासी मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 23:26 IST2016-01-05T23:26:15+5:302016-01-05T23:26:15+5:30
चीनमध्ये एका माथेफिरूने बसवर हल्ला करून ती पेटवून दिली. यात नऊ महिलांसह १७ प्रवासी मृत्युमुखी पडले, तर ३२ जण जखमी झाले आहेत

चीनमध्ये बस पेटवली, १७ प्रवासी मृत्युमुखी
बीजिंग : चीनमध्ये एका माथेफिरूने बसवर हल्ला करून ती पेटवून दिली. यात नऊ महिलांसह १७ प्रवासी मृत्युमुखी पडले, तर ३२ जण जखमी झाले आहेत. निंगशिया हुई या स्वायत्त प्रांतात मंगळवारी ही भयंकर घटना घडली.
यिनचुआन शहरातील एका फर्निचर मॉलजवळ सकाळी ७ वा. बसला आग लावण्यात आली. मा योंगपिंग याने हे कृत्य केल्याचा संशय असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे कपडे अंशत: जळाले आहेत.
बस पेटविताना ठिणग्या पडून ते जळाले असावेत, अशी शंका आहे. दरम्यान, मा याने बस का पेटवली याबाबत अधिकाऱ्यांनी काहीही सांगितले नाही. (वृत्तसंस्था)