शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बुरखा परिधान केलेल्या महिलेकडून गणेश मूर्तींची तोडफोड; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 10:42 IST

महिलेविरोधात तीव्र संताप; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओची पोलिसांकडून दखल

मनामा: मध्य पूर्वेतील बहारिनमध्ये गणेश मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुरखा परिधान केलेल्या एका महिलेनं सुपरमार्केटमध्ये ठेवण्यात आलेल्या गणेश मूर्ती जमिनीवर फेकल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांना याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या या कृत्याबद्दल महिलेवर टीका होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर बहारिनच्या गृह मंत्रालयानं या प्रकरणी निवेदन प्रसिद्ध केलं आहे.गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या शनिवारी म्हणजेच २२ ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. हिंदू समाज जगभरात पसरला असल्यानं अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो. बहारिनदेखील त्याला अपवाद नाही. एकीकडे गणेशभक्त आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना दुसरीकडे गणेशमूर्तींची तोडफोड होत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. बहारिनची राजधानी मनामाजवळ असलेल्या जफेयरमधील एका सुपरमार्केटमध्ये एका महिलेनं गणेश मूर्तींची तोडफोड केली. एका मुस्लिम देशात गणपतीच्या मूर्ती विकण्यास विरोध असल्याचं म्हणत तिनं ही तोडफोड केली. 'हा मुस्लिम देश आहे. इथे याला परवानगी दिली जाऊ शकत नाही,' अशा शब्दांमध्ये महिला दुकानदारावर अरबी भाषेत ओरडताना दिसत आहे. याशिवाय ती सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या मूर्ती जमिनीवर फेकतानाही दिसत आहे.  घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अनेकांनी महिलेचा समाचार घेतला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ५४ वर्षीय महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर गृह मंत्रालयानं ट्विट करत पोलीस कारवाईची माहिती दिली. 'एका ५४ वर्षीय महिलेनं जफेयरमध्ये जाणूनबुजून एका दुकानातल्या मूर्ती तोडल्या. या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. मनामाचे पोलीस महासंचालक यात लक्ष घालत आहेत,' अशी माहिती गृह मंत्रालयानं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव