Burning the girl who raped the girl for sexual assault | लैंगिक अत्याचाराची तक्रार देणाऱ्या मुलीला जिवंत जाळले
लैंगिक अत्याचाराची तक्रार देणाऱ्या मुलीला जिवंत जाळले

ढाका : बांगलादेशातील एका मदरशातील प्राचार्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार देणाºया एका किशोरवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. देशात या घटनेनंतर व्यापक आंदोलन होत आहे. ६ एप्रिल रोजी बुरखा परिधान केलेल्या चार जणांनी नुसरत रफी (१८) हिला जिवंत पेटविले होते. यातच तिचा मृत्यू झाला.
या घटनेच्या काही दिवस अगोदर मौलाना सिराज-उद-दौलाविरुद्ध आरोप करण्यात आला होता की, त्याने कार्यालयात बोलावून अयोग्यपणे स्पर्श केला होता. या प्रकरणात १७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात सिराज याचाही समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपमहानिरीक्षक रुहुल अमीन म्हणाले की, तपासासाठी आणखी काही दिवस लागतील. विविध दस्तऐवज तपासण्यात येत आहेत. तथापि, प्राचार्य सिराज याचा निंदनीय वागणूक देण्याचा इतिहास आहे, असेही त्यांनी सांगितले.
>संतप्त नागरिकांचे आंदोलन
नुसरत हिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; पण उपचार सुरू असताना तिचा १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, तिच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त नागरिक आंदोलन करीत आहेत.


Web Title:  Burning the girl who raped the girl for sexual assault
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.