बर्दवान बॉम्बस्फोट; आरोपीला अटक

By Admin | Updated: April 20, 2015 01:04 IST2015-04-20T01:04:26+5:302015-04-20T01:04:26+5:30

पश्चिम बंगालच्या बर्दवान येथे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयिताला शनिवारी झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातील तिलबिथा

Burdwan blasts; The accused arrested | बर्दवान बॉम्बस्फोट; आरोपीला अटक

बर्दवान बॉम्बस्फोट; आरोपीला अटक

पाकूर : पश्चिम बंगालच्या बर्दवान येथे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयिताला शनिवारी झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातील तिलबिथा रेल्वेस्थानकाजवळ अटक करण्यात आली. संशयित इब्राहीम शेख ऊर्फ लाल मोहंमद हा बांगलादेशमधील जमात-उल-मुजाहिदीन या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य आहे.
इब्राहीम हा पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथून झारखंडला आला होता. इब्राहीमच्या चौकशीसाठी सीआयडी पथक पाकूर येथे येणार आहे. बर्दवान बॉम्बस्फोटाबाबत हे पथक इब्राहीमची चौकशी करेल. तो प्रतिबंधित जमात-उल- मुजाहिदीनच्या ‘सुरा’चा (राजकीय कमिटी) सक्रिय सदस्य आहे, तसेच तो मुर्शिदाबाद येथील फातिमा-तुल-जोहर बानात मदरसाचाही प्रमुख आहे, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Burdwan blasts; The accused arrested