शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलमध्ये बंधारा फुटला; ३०० जण बुडाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:41 IST

शोधकार्य सुरू; नऊ जणांचे मृतदेह सापडले

ब्रमादिन्हो : आग्नेय ब्राझीलमधील एका खाणीतील बंधारा फुटून ३०० जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नऊ जणांचे मृतदेह सापडले असून कुणी जिवंत असण्याची शक्यता कमीच असल्याचे स्थानिक अधिकाऱ्याने म्हटले आहे.मिनास गेराईस राज्यातील ब्रमादिन्हो आणि बेलो हॉरिझोन्टी शहराजवळील या बंधाऱ्याचा वापर कोणत्याही कामासाठी केला जात नव्हता. तो फुटल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखल पसरला आहे. लोह खनिज खाणीत असलेला बंधारा फुटल्यानंतर युद्धस्तरावर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सात जणांचे मृतदेह आढळून आले.स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी यापूर्वी बेपत्ता असणाºयांची संख्या १५० असल्याचे म्हटले होते. शनिवारी मात्र ही संख्या दुप्पट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. फुटलेल्या बंधाऱ्याजवळच एका कंपनीचे प्रशासकीय कार्यालय असून तेथे काम करणाऱ्या १५० जणांचा बेपत्ता लोकांमध्ये समावेश आहे. ब्राझीलमधील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक अशी ही घटना मानली जाते. ब्राझीलचे खाणसम्राट व्हाले यांच्या मालकीची ही खाण असून यापूर्वी २०१५ मध्ये खाणीचा काही भाग कोसळून १९ जण ठार झाले होते.या दुर्घटनेनंतर व्हाले या कंपनीचे न्यूयॉर्क बाजारातील शेअर्स गडगडले आहेत. जीवितांच्या मदतीसाठी सर्वोतोपरी मदत केली जात आहे, आता कुणी जिवंत असण्याची शक्यता कमी झाली असून मृतदेहच हाती लागू शकतात, असे मिनास गेराईसचे गव्हर्नर रोेमेयू झेमा यांनी स्पष्ट केले. खाणीतील बंधारा फुटला त्यावेळी खाणीत ४२७ लोक काम करीत होते. २७९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून उर्वरित कामगारांना बेपत्ता मानण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)नव्या सरकारसमोर आणीबाणीचा प्रसंग...अध्यक्ष जेअर बोलसोनारो यांच्या नव्या सरकारसमोर प्रथमच आणीबाणीची स्थिती उद्भवली आहे. या महिन्याच्या प्रारंभी नव्या सरकारने सूत्रे स्वीकारली होती. सरकारने संरक्षण, खाण आणि पर्यावरण मंत्रालय तसेच मिनास गेराईस राज्याच्या अधिकाºयांमध्ये समन्वय साधून मदतकार्य चालविले आहे. बंधारा फुटल्यानंतर ३९ हजार लोकसंख्या असलेल्या ब्रमादिन्हो शहरालगतच्या परिसरात सर्वत्र चिखल पसरला असून पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक रस्ते वाहून गेले असून शेतांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक घरेही उद्ध्वस्त झाली. जमिनीशी संपर्क तुटल्यामुळे मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

टॅग्स :Brazilब्राझीलDamधरणAccidentअपघात