Bubonic Plague: Another disease that has spread to China after corona; Emergency imposed | Bubonic Plague: कोरोनानंतर चीनमध्ये पसरला आणखी एक रोग; प्रशासनाकडून आणीबाणी लागू

Bubonic Plague: कोरोनानंतर चीनमध्ये पसरला आणखी एक रोग; प्रशासनाकडून आणीबाणी लागू

ठळक मुद्देतीन वर्षांच्या मुलाला प्लेगची लागण झाल्याचं समोर आलं आहे.या घटनेनंतर चिनी प्रशासनाने या भागात चतुर्थ स्तरीय आणीबाणी जाहीर केली आहे.यापूर्वी ऑगस्टमध्ये उत्तर मंगोलियामध्ये प्लेगचा प्रार्दुभाव झाल्याची घटना घडली होती

बीजिंग – चीनमध्ये कोरोना विषाणूनंतर आता ब्यूबॉनिक प्लेग पसरला असून देशाच्या दक्षिण-पश्चिम भागात आणीबाणी घोषित केली आहे. तीन वर्षांच्या मुलाला प्लेगची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा मुलगा चीनमधील युन्नान प्रांतातील मेंघाई काउंटी येथील राहणारा आहे. गेल्या आठवड्यात चीनमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव झाल्याची घटना घडली होती मात्र रविवारी याची पुष्टी झाली

डेली एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार प्लेगची लागण झालेल्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले जात आहे. या घटनेनंतर चिनी प्रशासनाने या भागात चतुर्थ स्तरीय आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरससारखी आणखी एक रोग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी यून्नानमध्ये प्लेगची लागण झालेल्या तीन मृत उंदिर आढळून आले होते.

चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, मेंघाईच्या शिडिंग गावात उंदरांच्या प्रसाराची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये उत्तर मंगोलियामध्ये प्लेगचा प्रार्दुभाव झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर देशभर तृतीय स्तरावरील इशारे देण्यात आले. मंगोलियातही प्लेगचे २२ संशयित रुग्ण आढळले होते, त्यातील ६ जणांची पुष्टी झाली आहे.

ब्यूबॉनिक प्लेग हा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो. मात्र यासाठी अँन्टीबायॉटिक उपलब्ध आहेत. तृतीय स्तरीय इशाऱ्यानंतर प्लेगचा प्रार्दुभाव करणारे प्राणी खाण्यास बंदी घातली आहे. तसेच, प्लेगची लक्षणे आढळल्यास लोकांना त्वरित सूचना देण्यास सांगितले आहे. संपूर्ण जगभरात ब्यूबॉनिक प्लेग संक्रमण अनेकदा समोर येत असते. २०१७ मध्ये, मेडागास्करमध्ये ब्यूबॉनिक प्लेगची ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले होते.

ब्यूबोनिक प्लेगची लक्षणे

गेल्या वर्षी मेमध्ये मंगोलियात ब्यूबॉनिक प्लेगमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला होता. या लोकांनी कच्चे मांस खाल्ले. उंदीर आणि गिलहरीद्वारे हा व्हायरस मनुष्यात पसरतो. ब्यूबॉनिक प्लेगमुळे एखाद्या व्यक्तीला अचानक ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि अशक्तपणा येतो. शरीरातील एका किंवा अनेक ठिकाणी सूज येते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bubonic Plague: Another disease that has spread to China after corona; Emergency imposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.