अपघातात तुटलेले डोके पुन्हा देहावर बसविले
By Admin | Updated: May 25, 2015 00:43 IST2015-05-25T00:43:17+5:302015-05-25T00:43:17+5:30
कार अपघातात पाठीच्या कण्यापासून डोके तुटलेल्या ब्रिटिश माणसाचे प्राण वाचले असून, मूळ भारतीय डॉक्टरने त्याचे तुटलेले डोके पुन्हा बसविले

अपघातात तुटलेले डोके पुन्हा देहावर बसविले
लंडन : कार अपघातात पाठीच्या कण्यापासून डोके तुटलेल्या ब्रिटिश माणसाचे प्राण वाचले असून, मूळ भारतीय डॉक्टरने त्याचे तुटलेले डोके पुन्हा बसविले. अनंत कामत असे या डॉक्टरचे नाव असून, त्यांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली आहे. टोनी कोवान या ब्रिटिश माणसावर त्यांनी शस्त्रक्रिया करून तुटलेले डोके धातूची पट्टी व खिळे यांच्या साहाय्याने परत पाठीच्या कण्याला जोडले आहे.
टोनी कोवान हे न्यूकॅसल सिटी येथे राहत असून, गेल्यावर्षी ९ सप्टेंबर रोजी त्यांना अपघात झाला होता. स्पीडब्रेकरवर त्यांची कार धडकली व नियंत्रण सुटून ती जवळच्या टेलिफोनच्या खांबावर आदळली. अपघात होताच कोवान यांचे शिर तुटले व हृदयाची धडधड थांबली. तुटलेले डोके स्नायू व उती यांच्या साहाय्याने शरीराला लटकले होते. हृदय बंद पडल्यामुळे डॉक्टरांनी प्रथम कृत्रिम श्वास देऊन हृदय चालू केले.
कोवान यांच्या मानेला फ्रॅक्चर झाले होते व पाठीच्या कण्याला जखम झाली होती. अशा जखमा झालेला माणूस कधीच जगत नाही, असे वैद्यकीय शास्त्रात समजले जाते.
मात्र, असे असले तरीही कोवान यांच्या मेंदूला काही दुखापत झाली नव्हती. त्यामुळे त्यांचे डोके परत देहावर बसवता आले. (वृत्तसंस्था)