शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:27 IST

महत्वाचे म्हणजे, जुलै २०२५ मध्येच भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. स्टार्मर यांचा हा दौरा दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारीला अधिक बळ देणारा ठरेल.

नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे बुधवार (८ ऑक्टोबर २०२५) दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आगमन झाले. त्यांच्या आगमनापूर्वीच, ब्रिटिश एअरवेजच्या मुंबईला जाणाऱ्या '९१००' या विमानात त्यांनी प्रवाशांशी साधलेला मजेशीर संवाद इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ त्यांनी स्वतःच शेअर केला आहे.

'कॉकपिटमध्ये तुमचे पंतप्रधान आहेत...' -विमानातील प्रवाशांना अभिवादन करताना स्टार्मर मिश्किलपणे म्हणाले, "कॉकपिटमध्ये तुमचे पंतप्रधान आहेत. नाही, ही हवाई सुरक्षेशी संबंधित कोणतीही घोषणा नाही." खरे तर, लंडनला नवी दिल्लीसोबत अपेक्षित असलेल्या प्रमुख आर्थिक भागीदारीची ही प्रतीकात्मक सुरुवात होती. 

१२५ हून अधिक व्यावसायिक आणि अधिकारी स्टार्मर यांच्यासोबत - महत्वाचे म्हणजे, स्टार्मर हे भारतातीलइंग्लंडच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ट्रेड मिशनचे संचालन करत आहेत. आपल्या सर्वांचे आमच्यासोबत असणे खरोखरच खूपच छान आहे. मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. कारण आम्ही आपल्या मुक्त व्यापर करारात सर्व संधींची माहिती करून घेत आहोत. स्टार्मर यांच्यासोबत १२५ हून अधिक व्यावसायिक आणि अधिकारीही आहेत. 

नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून स्टार्मर भारत दौऱ्यावर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून स्टार्मर भारत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेते 'व्हिजन २०३५' च्या अनुषंगाने भारत-ब्रिटन व्यापक रणनीतिक भागीदारीच्या (Comprehensive Strategic Partnership) सर्व पैलूंमधील प्रगतीचा आढावा घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जुलै २०२५ मध्येच भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. स्टार्मर यांचा हा दौरा दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारीला अधिक बळ देणारा ठरेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : British PM Starmer's amusing flight announcement upon India arrival.

Web Summary : British PM Keir Starmer, on a two-day India visit, lightheartedly greeted passengers on a Mumbai-bound flight, announcing his presence. Accompanied by 125+ business leaders, he aims to boost UK-India trade ties following the recent FTA, strengthening economic partnership.
टॅग्स :Englandइंग्लंडIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी