४१२ किलो वजनाच्या ब्रिटिश व्यक्तीचा मृत्यू

By Admin | Updated: June 23, 2015 00:02 IST2015-06-23T00:02:58+5:302015-06-23T00:02:58+5:30

सर्वाधिक वजन असलेली व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या ब्रिटनच्या कार्ल थॉम्पसन यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झाले.

British person dies at 412 kg | ४१२ किलो वजनाच्या ब्रिटिश व्यक्तीचा मृत्यू

४१२ किलो वजनाच्या ब्रिटिश व्यक्तीचा मृत्यू

लंडन : सर्वाधिक वजन असलेली व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या ब्रिटनच्या कार्ल थॉम्पसन यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वजन ४१२ किलोग्रॅम एवढे होते.
कार्ल थॉम्पसन दिवसाला १० हजार कॅलरी एवढी ऊर्जा असलेले अन्न सेवन करीत असे. केन्य येथील राहत्या घरी रविवारी त्यांचे निधन झाले. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या पथकाला कार्ल यांचा मृतदेह घराबाहेर काढण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांचा मृतदेह घराबाहेर काढण्यासाठी अनेक तास लागले. (वृत्तसंस्था)


 

 

Web Title: British person dies at 412 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.