‘ब्रेक्झिट’साठी ब्रिटिश पार्लमेंटची मंजुरी

By Admin | Updated: February 3, 2017 00:20 IST2017-02-02T01:56:46+5:302017-02-03T00:20:33+5:30

युरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्यासाठी (ब्रेक्झिट) ब्रिटिश संसदेने बुधवारी पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे.

British Parliament's approval for 'bravejit' | ‘ब्रेक्झिट’साठी ब्रिटिश पार्लमेंटची मंजुरी

‘ब्रेक्झिट’साठी ब्रिटिश पार्लमेंटची मंजुरी

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 02  - युरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्यासाठी (ब्रेक्झिट) ब्रिटिश संसदेने बुधवारी पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे.
युरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याची (ब्रेक्झिट) औपचारिक कारवाई सुरू करण्यापूर्वी ब्रिटन सरकारने ब्रिटिश संसदेची मंजुरी घेणे बंधनकारक आहे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यामुळे ब्रिटिश संसदेत बुधवारी ब्रेक्झिट विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला पहिल्या टप्प्यात मंजूरी देण्यात आली आहे. 
दरम्यान, या मंजुरीनंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे समजते. तसेच, युरोपीय संघाच्या लिस्बोन करारानुसार पंतप्रधान थेरेसा मे यांनी कलम 50 लागू केल्यानंतर ब्रेक्‍झिटची प्रक्रिया सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.   
 

Web Title: British Parliament's approval for 'bravejit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.