शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या मुलासाठी तस्करी करुन गांजा आणणार- ब्रिटिश मातेचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 12:43 IST

इंग्लंडमध्ये वैद्यकीय उपयोगासाठीही गांजा वापरण्यास बंदी आहे.

लंडन- एपिलेप्सीशी (अपस्मार-फिट्स येणे) झगडणाऱ्या आपल्या मुलासाठी गांजायुक्त औषध आणण्याचा निर्णय एका ब्रिटिश महिलेने घेतला आहे. इंग्लंडमध्ये वैद्यकीय कारणासाठी गांजा वापरण्यास बंदी आहे. आपल्या मुलाला विशिष्ट गांजायुक्त औषध मिळावे यासाठी शार्लोट काल्डवेल गेले अनेक महिने इंग्लंडमध्ये प्रयत्न करत आहेत.शार्लोट यांच्या मुलाचे नाव बिली असून त्याला अपस्माराचा त्रास आहे. त्याच्या आजारावर नियंत्रण यावे यासाठी शार्लोट यांनी अमेरिकेतील डॉक्टरांशी चर्चा केली होती आणि गांजायुक्त औषधाचे प्रिस्क्रिप्शन मिळवले बोते. इंग्लंडमध्ये अथक प्रयत्नांनंतर बिलीच्या उपचारांसाठी ते औषध पुरवण्यास एक डॉक्टर तयारही झाले मात्र इंग्लंडच्या गृहविभागाने नुकतेच हे औषध वापरु नये असे आदेश दिले आहेत. जर हे औषध डॉक्टर पुरवत राहिले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद गृहविभागाने दिली आहे.त्यामुळे शार्लोट यांनी आता आपल्याकडे केवळ स्मगलिंगचा पर्याय शिल्लक राहिला असल्याचे सांगत आपल्या मुलासाठी कॅनडातून इंग्लंडमध्ये परत येताना गांजायुक्त औषध आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. औषधी उपयोगासाठी गांजाचा वापर करण्यास कॅनडामध्ये परवानगी आहे. आता तर इतर उपयोगांसाठी गांजा खुला करण्याच्या हालचाली कॅनडामध्ये सुरु असून लवकरच तेथे गांजाचा वापर कायदेशीर होणार आहे. आपल्या मुलाच्या आयुष्यासमोर आपण घेत असलेला निर्णय अत्यंत लहान असल्याचे मत शार्लोट यांचे आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडHealthआरोग्य