ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 23:42 IST2016-06-16T22:49:29+5:302016-06-16T23:42:49+5:30

ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष लेबर पार्टीतल्या 41 वर्षीय महिला खासदार जो कॉक्स यांची हत्या झाली

British MP Joe Cox murdered | ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या

ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 16 - ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष लेबर पार्टीतल्या 41 वर्षीय महिला खासदार जो कॉक्स यांची हत्या झाली आहे. उत्तर इंग्लंड स्थित जो कॉक्स यांच्या परिसरातच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर आधी चाकूने हल्ला केला आणि नंतर गोळी झाडण्यात आली. खासदारांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही घटना ब्रिटिशच्या युरोपीय संघ सदस्यत्वाच्या पार्श्वभूमीवर घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.  
बीबीसीच्या माहितीनुसार हल्लेखोर हल्ला करून पसार झाले आहेत. या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. यार्कशर पोलिसांनी 52 वर्षांच्या एक व्यक्तीला या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या खासदार काही लोकांसोबत बैठक केली होती. कॉक्स इंग्लंडमध्ये होणा-या 23 जूनच्या जनमत संग्रहाच्या आधी ब्रिटेन युरोपीय संघात राहण्याचं समर्थन करत होत्या. खासदारांना एअर अँब्युलन्सनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. गोळीबारानंतर रक्ताच्या थारोळ्यात कॉक्स रस्त्यावर पडल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे.  

Web Title: British MP Joe Cox murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.