ब्रिटिश एअरवेजने कुंबळेचे लगेज सुरक्षित पोहचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 19:28 IST2016-07-08T19:28:41+5:302016-07-08T19:28:41+5:30
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याची कॅरेबियन दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. कारण एअरवेजच्या चुकीमुळे त्याची बॅग लंडनमध्ये राहिली

ब्रिटिश एअरवेजने कुंबळेचे लगेज सुरक्षित पोहचविले
सेन्ट किटस : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याची कॅरेबियन दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. कारण एअरवेजच्या चुकीमुळे त्याची बॅग लंडनमध्ये राहिली, पण ब्रिटिश एअरवेजने तत्परता दाखवताना शुक्रवारी त्याचे लगेज सेन्ट किट््सला पोहचविले. त्यासाठी ब्रिटिश एअरवेजने कुंबळेची माफीही मागितली होती.
ब्रिटिश एअरवेजने टिष्ट्वट करताना म्हटले की,ह्यअनिल कुंबळे आम्हाला जाहीर करताना आनंद होत आहे की, आम्ही तुमची बॅग यशस्वीरीत्या नियोजित स्थळीmपोहचवली आहे. मालिकेसाठी शुभेच्छा भारतीय क्रिकेटपटूची माफी मागण्याची घटना ब्रिटिश एअरवेजच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.