शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Britain Queen Elizabeth died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 23:22 IST

Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं आज निधन झालं.

Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं आज वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या सध्या स्कॉटलंडच्या Balmoral castle मध्ये वास्तव्यास होत्या. या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. किंग व क्वीन कंसोर्ट रात्री बाल्मोरलमध्ये राहतील. ते उद्या लंडनमध्ये परततील.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या महाराणी होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्यांचा जन्म लंडनमध्ये ड्यूक जॉर्ज सहावे व राजमाता राणी एलिझाबेथ यांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांनी १९३६ मध्ये एडवर्ड आठवे यांच्या पदत्यागानंतर सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा त्या राज्याच्या उत्तराधिकारी झाल्या. १९४७मध्ये त्यांचा विवाह राजकुमार फिलीप यांच्याशी झाला.  ९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांनी त्यांच्या पणजी महाराणी व्हिक्टोरिया यांच्या सर्वांत जास्त शासनकाळाचा विक्रम मोडला व त्या ब्रिटनवर सर्वाधिक काळ शासन करणाऱ्या सम्राज्ञी झाल्या. १९५२ मध्ये राणीचा राज्याभिषेक झाला होता आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक बदलही झाले.प्रकृती खालावली होतीमहाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल हे ब्रिटनचे राजे असतील. गुरूवारीच एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय स्कॉटलंडला रवाना झाले होते. महाराणी या episodic mobility या आजारानं ग्रस्त होत्या अशी माहिती शाही कुटुंबाकडून देण्यात आली. त्यांना चालण्यात आणि उभं राहण्यातही त्रास होत होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना फेब्रुवारी महिन्यातच कोरोनाची लागणही झाली होती.पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:खमहाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. महाराणी एलिझाबेथ यांना आमच्या वेळच्या दिग्गजांच्या रुपात स्मरणात ठेवलं जाईल. त्यांनी सार्वजनिक जीवनात सन्मान दाखवला. त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं आहे आणि माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब आणि ब्रिटनच्या जनतेसोबत आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Queen Elizabeth IIमहाराणी एलिझाबेथ द्वितीयEnglandइंग्लंड