शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नर्सचे धक्कादायक कृत्य; हवेचे 'इंजेक्शन' देऊन 7 बाळांना मारले, 10 चिमुकल्यांना मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:46 IST

ब्रिटेनमधील एका 32 वर्षीय नर्सवर 7 चिमुकल्यांची हत्या आणि 10 जणांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Britain Crime News: ब्रिटनमधील एका नर्सवर 7 लहान मुलांच्या हत्येचा आरोप आहे. घटना 2015ची असून, तिच्यावर आणखी 10 मुलांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आहे. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. यात एका मुलाच्या आईने सांगितले की, ती 4 ऑगस्ट 2015 रोजी नॉर्थ वेस्ट इंग्लंडमधील चेस्टर हॉस्पिटलच्या निओ-नेटल युनिटमध्ये आली, तेव्हा तिचा मुलगा अस्वस्थ दिसत होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होते आणि नर्स लुसी लेटबी तिथेच होती. त्या मुलाच्या शरीरात रिकामे इंजेक्शन दिल्याचे आढळून आले.

32 वर्षीय नर्सवर आरोपमिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय नर्स लुसी लेटबीवर मुलांच्या हत्येचा आरोप आहे. पण, अद्याप आरोपी नर्सने खुनाची कबुली दिलेली नाही. या नर्सवर आणखी 10 मुलांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आहे. सुनावणीदरम्यान, वकिलाने सांगितले की, लेटबीने आपला गुन्हा लपवण्यासाठी खोट्या नर्सिंग नोट्सही बनवल्या होत्या. पहिल्या बाळाचा मृत्यू 5 ऑगस्ट 2015 रोजी झाला होता. त्यानंतर लेटबीने आणखी एका जुळ्या भावांना इन्सुलिनचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला. 

नर्सने अनेकांना मारण्याचा प्रयत्न केलाविशेष म्हणजे, डॉक्टरांनी त्या वॉर्डातील एकाही मुलाला इन्सुलिन देण्यास सांगितले नव्हते. मुलांना इंजेक्शन दिले, तेव्हा लेटबी त्याच खोलीत होती. चेस्टर हॉस्पिटलच्या काउंटेसच्या निओ नेटल युनिटमध्ये मुलांचा मृत्यू झाला तेव्हा, सर्व प्रकरणांमध्ये फक्त लेटबी तिथे उपस्थित होती. या रुग्णालयात जून 2015 ते जून 2016 या कालावधीत 5 मुले व 2 मुलींची हत्या झाली असून 5 मुले व 5 मुलींच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू