शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कठीण काळात भारतानं दिली रशियाची साथ; आता पुतीन यांनी दिली मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 18:41 IST

पुतिन म्हणाले, 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापार 38 टक्क्यांनी वाढला आहे. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार वाढून 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

चीनने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेला बुधवारी सुरुवात झाली आहे. व्हर्च्युअल पद्धतीने होत असलेल्या या 14 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठे विधान केले आहे. "रशियामध्येभारतीय स्टोअर्स सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे, असे पुतीन यांनी म्हटले आहे.

ब्रिक्स परिषदेत बोलताना पुतिन म्हणाले, रशिया आणि ब्रिक्स देशांच्या व्यापारी समुदायांमधील संपर्क आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रशियामध्ये भारतीय स्टोअर्स सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, कोणत्या भारतीय स्टोअरची चेन रशियामध्ये सुरू होईल, हे पुतीन यांनी स्पष्ट केले नाही.

पुतिन म्हणाले, चिनी कार, उपकरणे आणि हार्डवेअर देखील रशियन बाजारांत आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. याच बरोबर, ब्रिक्स देशांमध्येही रशियाची उपस्थिती वाढत आहे, असेही पुतिन म्हणाले. ब्रिक्स पाच देशांची संघटना आहे. यात भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेचा समावेश आहे.

रशिया आणि ब्रिक्स देशांचा व्यापार 38 टक्क्यांनी वाढला - पुतिन म्हणाले, 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापार 38 टक्क्यांनी वाढला आहे. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार वाढून 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. रशिया ब्रिक्स देशांना तेला शिवाय, मोठ्या प्रमाणावर फर्टिलायझरची निर्यातही करत आहे. तसेच, रशियातील आयटी कंपन्या भारत आणि दक्षिण अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, असेही पुतिन यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाIndiaभारतchinaचीन