सायकल अपघातात केरींचा पाय मोडला

By Admin | Updated: June 1, 2015 01:59 IST2015-06-01T01:59:09+5:302015-06-01T01:59:09+5:30

सायकल चालविण्याची आवड असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचा पाय फ्रान्समध्ये एका सायकल अपघातात फ्रॅक्चर झाला असून, उपचारांसाठी

Break a carrier's foot in a bicycle accident | सायकल अपघातात केरींचा पाय मोडला

सायकल अपघातात केरींचा पाय मोडला

जिनिव्हा : सायकल चालविण्याची आवड असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचा पाय फ्रान्समध्ये एका सायकल अपघातात फ्रॅक्चर झाला असून, उपचारांसाठी ते मायदेशी जाणार आहेत. ७१ वर्षीय केरींना सध्या हेलिकॉप्टरने जिनिव्हा विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सायकल अपघातात केरी यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले आहे. परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, केरी यांची प्रकृती स्थिर असून ते शुद्धीवर आहेत.स्वीत्झर्लंडच्या सीमेपासून ४० किलोमीटर अंतरावर फ्रान्सच्या साइनोझिअर भागात सायकल चालवताना केरी यांचा अपघात झाला. अपघातावेळी केरी यांच्या ताफ्यात डॉक्टर तैैनात होते.
अणुवाटाघाटींबाबत इराणी राजदूताशी चर्चेसाठी केरी सध्या जिनिव्हा येथे आहेत. केरी यांनी सायकलने शहरापासून ३० मैैल अंतर कापले होते. दरम्यान, संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यासाठी केरी सोमवारी माद्रीदला जाणार होते. मात्र, या अपघातानंतर त्यांनी आपला चार देशांचा दौरा आटोपता घेत बोस्टनला परतण्याचा निर्णय घेतला आहे. केरी हे सायकलप्रेमी म्हणून ओळखले जातात. एवढेच नाही तर ते आपल्या दौऱ्यात नेहमी सायकल घेऊन जातात. (वृत्तसंस्था)

Web Title: Break a carrier's foot in a bicycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.