ब्रेडविके्रती बनली मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 00:54 IST2017-02-10T00:54:18+5:302017-02-10T00:54:18+5:30

कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, नायजेरियातील ही ब्रेड विक्रेती तरुणी चक्क मॉडेल बनली आहे

Breadcrumbled Model | ब्रेडविके्रती बनली मॉडेल

ब्रेडविके्रती बनली मॉडेल

अबुजा : कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, नायजेरियातील ही ब्रेड विक्रेती तरुणी चक्क मॉडेल बनली आहे. त्याचे झाले असे की, संगीतकार, फोटोग्राफर बेलो हे येथे फोटो शूट करीत होते. याचे वेळी त्यांनी या बे्रड विक्रेत्या तरुणीचे फोटो काढले आणि ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. हे फोटो पाहून अनेकांनी विचारणा केली की, ही तरुणी कोण आहे? ती जर मॉडेल असेल, तर खरोखरच खूप सुंदर आहे. ही २७ वर्षीय तरुणी दोन मुलांची आई आहे. या ब्रेड विक्रेत्या तरुणीच्या फोटोंना एवढी पसंती मिळत आहे की, मॉडेलिंगच्या आॅफरही तिला मिळू लागल्या आहेत. म्हणतात ना नशिबाने साथ दिली, तर कोण कुठे जाईल सांगता येत नाही.

Web Title: Breadcrumbled Model