शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 23:11 IST

उड्डाणादरम्यान पर्यटकांच्या या हॉट एअर बलूनला आग लागली आणि तो प्रेया ग्रांडे शहरात कोसळला. दुर्घटनेत २१ प्रवाशांपैकी ८ जणांचा मृत्यू झाला.

ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात एक भयानक अपघात घडला आहे. स्थानिक आणि राज्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कॅटरिना येथे २१ प्रवाशांना घेऊन जाणारा एक गरम हवेचा फुगा अर्थात हॉट एअर बलून कोसळला, ज्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत.

राज्य अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या उड्डाणादरम्यान पर्यटकांच्या या हॉट एअर बलूनला आग लागली आणि तो प्रेया ग्रांडे शहरात कोसळला. दुर्घटनेत २१ प्रवाशांपैकी ८ जणांचा मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या १३ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वीही घडली आहे अशी घटनाब्राझीलमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. गेल्या रविवारी, साओ पाउलो राज्यातही एक फुगा कोसळला होता, ज्यात २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि ११ जण जखमी झाले होते, असे 'जी१' वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

ब्राझीलमधील प्रेया ग्रांडे हे 'हॉट-एअर बलूनिंग'साठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. जून महिन्यात सेंट जॉनसारख्या कॅथोलिक संतांच्या उत्सवादरम्यान ब्राझीलच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये हा एक लोकप्रिय उपक्रम असतो. यासाठी लोक दूरदूरून येथे येतात.

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह!या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर्यटकांची कोणतीही काळजी न घेता केलेल्या या कृतीवर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका वापरकर्त्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "कोणतीही काळजी न घेत असे साहस करणे हा गुन्हा आहे - पर्यटन नाही." यासोबतच, या अपघातामुळे ब्राझीलच्या सांता कॅटरिना अधिकाऱ्यांवरही टीका झाली आहे की, राज्यात सुरक्षा तपासणीशिवाय अशा कृती कशा केल्या जात आहेत. या घटनेने साहसी पर्यटनातील सुरक्षेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBrazilब्राझील