‘ब्रेन डेड’ महिलेला झाला मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2016 05:41 IST2016-06-09T05:41:20+5:302016-06-09T05:41:20+5:30

पोर्तुगालमध्ये चार महिन्यांपासून ‘ब्रेन डेड’ असलेल्या महिलेने मुलाला जन्म दिल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

'Brain Dead' was a woman's boy | ‘ब्रेन डेड’ महिलेला झाला मुलगा

‘ब्रेन डेड’ महिलेला झाला मुलगा


वॉशिंग्टन : पोर्तुगालमध्ये चार महिन्यांपासून ‘ब्रेन डेड’ असलेल्या महिलेने मुलाला जन्म दिल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. लिस्बन येथील रुग्णालयात या महिलेची सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. बाळ सुखरूप असून, त्याचे वजन २.३५ किलो आहे. त्याच्या आईला मेंदूत रक्तस्राव झाल्याने २० फेब्रुवारी रोजी तिला ‘ब्रेन डेड’ घोषित केले होते. गर्भातील बाळ तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, पतीच्या संमतीने या महिलेचे गर्भारपण अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: 'Brain Dead' was a woman's boy