शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडने ब्रेकअप केला; दुःखी तरुणीने 10000 फूट उंचीवरुन पॅराशूटशिवाय मारली उडी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:10 IST

400 हून अधिक स्कायडायव्हिंगचा अनुभव असलेल्या तरुणीचा जमिनीवर आपटून जागीच मृत्यू.

एका 32 वर्षीय तरुणीने ब्रेकअपनंतर अतिशय भयंकर पद्धतीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रेअकपचा धक्का सहन न झाल्यामुळे तिने असे पाऊल उचलले, ज्याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल. जेड डॅमरेल नावाची ही महिला एक अनुभवी स्कायडायव्हर होती. पण, ब्रेकअपच्या दुसऱ्याच दिवशी तिने पॅराशूटशिवाय 10,000 फूट उंचीवरुन उडी मारली, ज्यामुळे जेडचा जागीच मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साउथ वेल्सची रहिवासी जेड डॅमरेल ही 26 वर्षीय बेन गुडफेलोसोबत सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होती. बेनदेखील एक स्कायडायव्हर आहे. या स्कायडायव्हिंगमुळेच दोघे जवळ आले. एकमेकांच्या प्रेमाड बुडालेले जेड आणि बेन एकत्र राहू लागले. पण, हळुहळू त्यांच्या नात्यात दुरावा यायला लागला. सहा महिने सोबत राहिल्यानंतर बेनने जेडसोबत ब्रेकअप केला. 

या ब्रेकअपचा धक्का सहन न झाल्यामुळे जेडने टोकाचे पाऊल उचलले. रिपोर्टनुसार, सुरुवातीला हा एक दुःखद अपघात मानला जात होता. परंतु, नंतर तपासात असे आढळले की, जेड डॅमरेलने जाणूनबुजून तिचे पॅराशूट उघडले नव्हते. तपासणीदरम्यान डायव्हिंग उपकरणांमध्ये कोणताही दोष आढळला नाही. जेडच्या मित्रांचे म्हणणे आहे की, पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये ब्रेकअपचा उल्लेख आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू