न्यूयॉर्कच्या महापौरांवर बहिष्कार

By Admin | Updated: December 29, 2014 04:03 IST2014-12-29T04:03:05+5:302014-12-29T04:03:05+5:30

कृष्णवर्णीयांच्या हत्येचा सूड उगविण्यासाठी न्यूयॉर्क शहरात हत्या झालेल्या पोलीस अधिका-यांच्या अंत्ययात्रेत हजारो पोलीस सहभागी झाले

Boycott of New York Mayor | न्यूयॉर्कच्या महापौरांवर बहिष्कार

न्यूयॉर्कच्या महापौरांवर बहिष्कार

न्यूयॉर्क : कृष्णवर्णीयांच्या हत्येचा सूड उगविण्यासाठी न्यूयॉर्क शहरात हत्या झालेल्या पोलीस अधिका-यांच्या अंत्ययात्रेत हजारो पोलीस सहभागी झाले; पण अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या न्यूयॉर्कच्या महापौराकडे त्यांनी पाठ फिरविली. रॅफेल रामोस या पोलीस अधिकाऱ्याची अंत्ययात्रा न्यूयॉर्क शहरातील पोलिसांच्या अंत्ययात्रेतील एक मोठी अंत्ययात्रा ठरली.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन हे या अंत्ययात्रेत उपस्थित होते; पण न्यूयॉर्कचे महापौर बिल दि ब्लासियो यांना पोलिसांचा संताप सहन करावा लागला. परंपरेनुसार महापौर ब्लासियो हे भाषण देण्यासाठी उभे राहिले असता, हजारो पोलिसांनी शांतपणे त्यांच्याकडे पाठ फिरवली.

 

Web Title: Boycott of New York Mayor