शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आयफोनसाठी ९ वर्षांपूर्वी किडनी विकलेला 'तो' सध्या काय करतो?; वाचून धक्का बसेल

By कुणाल गवाणकर | Updated: November 17, 2020 17:20 IST

नवा आयफोन आल्यावर किडनी विकण्याची चर्चा होते; पण ९ वर्षांपूर्वी अशी घटना प्रत्यक्षात घडली होती

आयफोन लॉन्च झाल्यावर त्याच्या फीचर्सइतकीच चर्चा किमतीचीदेखील होते. १३ ऑक्टोबरला आयफोन १२ सीरिज लॉन्च झाली. या सीरिजच्या किमतीची मोठी चर्चा झाली. त्यावर बरेच मीम्स आले. आयफोन १२ खरेदी करण्याऐवजी त्याच किमतीत काय काय खरेदी करता येऊ शकेल, याची यादीदेखील सोशल मीडियावर फिरू लागली. आयफोन १२ विकत घेण्यासाठी किडनी विकावी लागेल, अशाही चर्चा झाल्या. आयफोनची नवी सीरिज लॉन्च झाल्यावर प्रत्येकवेळीही किडनी विकण्याची चर्चा होते.आयफोन घ्यायचा तर किडनी विकावी लागणार, ही गोष्ट सगळेच विनोद म्हणून घेतात. मात्र ९ वर्षांपूर्वी अशीच एक घटना चीनमध्ये घडली होती. ऍपलची दोन उत्पादनं खरेदी करण्यासाठी वँग शांगकू नावाच्या तरुणानं त्याची किडनी विकली होती. किडनी विकली, त्यावेळी वँगचं वय १७ वर्ष होतं. काळ्या बाजारात त्यानं किडनी ३ हजार २७३ अमेरिकन डॉलर्सना विकली. या पैशातून त्यानं आयफोन ४ आणि आयपॅड २ खरेदी केले.वँगला आयफोन खरेदी करायचा होता. मात्र त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याचवेळी तो अवयवांचा काळा बाजार करणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आला. किडनीसाठी २० हजार युआन (३ हजार अमेरिकन डॉलर) मिळत असल्याचं त्या व्यक्तीनं वँगला सांगितलं. त्यानंतर वँगनं मध्य हुनान प्रांतात अवैधपणे शस्त्रक्रिया केली. त्याची उजवी किडनी काढण्यात आली.वँगवर झालेल्या शस्त्रक्रियेला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याची वँगची अवस्था अतिशय वाईट आहे. तो डायलिसिसवर आहे. आयुष्यभर त्याला अंथरुणातच राहावं लागणार आहे. अवैध शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही महिन्यांतच वँगच्या दुसऱ्या किडनीला संसर्ग झाला. त्याची अवस्था गंभीर होऊ लागली. तो अंथरुणाला खिळला. त्याला दररोज डायलिसीसची गरज भासू लागली.वँगची अवस्था पाहून त्याच्या आईला संशय आला. तिनं बरीच विचारणा केल्यानंतर वँगनं घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात ९ जणांना अटक करण्यात आली.