शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वणव्यात अडकलेल्या सशाला वाचवण्यासाठी तरुणाचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 17:50 IST

कॅलिफोर्नियामधील जंगलात लागलेल्या या वणव्यात सशाचं एक पिल्लु अडकलं होतं आणि त्याला वाचवण्यासाठी हा तरुण प्रयत्न करत होता.

ठळक मुद्देहा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच क्षणार्धात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून या जिगरबाज तरुणाचं आता जगभर कौतुक होतंय.मुक्या प्राण्यांचेही जीव मोलाचे असतात. त्यांना बोलता येत नसलं तरीही त्यांनाही वेदना असतात.

कॅलिफोर्निया : प्राणीप्रेमी कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ देत नाहीत. त्यांच्यासमोर एखादं लहानसं पिल्लू आलं तरीही ते त्यांच्याकडे आदराने आणि प्रेमाने पाहतात. त्यांच्याशी आपुलकीने वागतात. त्यांना आपल्या लहान मुलांप्रमाणेच वागतात. एखादा प्राणी जर आगीत अडकला असेल तर आपला जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढला नाही तर मग नवलच. तुम्ही जर प्राणीप्रेमी असाल तर तुम्हाला तर हे नक्कीच पटेल. पण तुम्ही जर प्राणीप्रेमी नसाल तर तुम्हाला हे सारं अतिशयोक्ती वाटेल. पण हे खरं ठरलंय कॅलिफोर्नियामध्ये. 

याहू डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगलात अचानक वणवे पेटतात. त्यामुळे येथील नागरिक नेहमीच टांगत्या तलवारीखालीच जगत आहेत. इकडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर  प्रचंड व्हायरल होतोय. नुसताच व्हायरल होत नसून अनेकांनी या व्हिडिओला बरीच पसंती दिली आहे. यामागचं कारणही अगदी तसंच आहे.

 

एका जंगलात लागलेल्या वणव्यात एक सशाचं छोटंसं पिल्लू अडकलं होतं. अडकलेल्या पिल्लाला पाहून एका तरुणाला वाईट वाटलं. हा व्हिडिओ पाहून त्याचा त्रास आपण अनभवू शकतो. या वणव्यापासून या सशाला वाचवलं पाहिजे याकरता तो तरुण प्रयत्न करतो. आगीच्या ज्वाळा भडकत असताना आपल्या जीवाची तमा न बाळगता या तरुणाने सशाला पकडण्यासाठी प्रयत्न केले.

वणवा पेटला असताना मनुष्य काही फुटांवरही उभं राहू शकत नाही, कारण या वणव्याच्या ज्वाळा दूरवर पसरत असतात. पण तरीही एका जिद्दी प्राणीमित्रानं कसलाही विचार न करता आपल्या प्राणाची बाजी लावून सशाच्या पिल्लाला वाचवलं. हा सगळा प्रकार तिकडे उपस्थित असलेल्या लोकांनी व्हिडिओत कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत तेथील स्थानिक माध्यमांनी  संपर्क साधला असता त्यांच्याकडे काही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे समजले. पण या अज्ञात तरुणाविषयी जाणून घ्यायची अनेक नेटीझन्सची इच्छा आहे. 

आणखी वाचा - नवरदेव हत्तीवर तर वऱ्हाडी घोडे अन् उंटावर; पुण्यातील अनोखा विवाहसोहळा...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच क्षणार्धात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून या जिगरबाज तरुणाचं आता जगभर कौतुक होतंय. ज्याप्रमाणे माणसाचं जीव मोलाचे असतात, त्याचप्रमाणे मुक्या प्राण्यांचेही जीव मोलाचे असतात. त्यांना बोलता येत नसलं तरीही त्यांनाही वेदना असतात. त्यामुळे त्यांना या आगीच्या ज्वाळाच्या वेदनातून बाहेर काढण्यासाठी एका तरुणाने चक्क वणव्यातच उडी घेतली. हा सगळा प्रकार आता सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरला आहे. 

आणखी वाचा - आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयUSअमेरिकाTwitterट्विटर