शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बॉसने टॉयलेटमध्ये बसवले कॅमेरे, फोटो लीक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 12:56 IST

Boss installs cameras in toilets : फोटो समोर आल्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, कंपनीने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एका कंपनीच्या बॉसने टॉयलेटमध्ये सुद्धा कॅमेरे बसवल्याचे म्हटले जात आहे. या बॉसला संशय होता की टॉयलेटमध्ये कर्मचारी धूम्रपान करतात आणि फोनवर बराच वेळ घालवतात. दरम्यान, टॉयलेटचे काही फोटो ऑनलाईन लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर कंपनीच्या बॉसवर टीका होत आहे. मात्र, फोटो समोर आल्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, कंपनीने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे म्हटले आहे. 

हे प्रकरण दक्षिण चीनमधील एका शहरातील आहे. येथील एका टेक कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रेड स्टार न्यूजच्या रिपोर्टनुसार, टॉयलेटमध्ये ब्रेक टाइम घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तीन फोटो लीक झाले आणि नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिन्ही फोटोंमध्ये तीन वेगवेगळे पुरुष टॉयलेटमध्ये धूम्रपान करताना आणि फोन वापरताना दिसत आहेत. 

कंपनीने इतर कर्मचाऱ्यांना सावध करण्यासाठी या तीन फोटोंचा वापर केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. जेणेकरून इतरांनी कंपनीच्या पॉलीसीची उल्लंघन करू नये. पण या फोटोंमुळे सोशल मीडियावर कंपनीवर टीका केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावर लोक कंपनीला टार्गेट करताना दिसून येत आहे.

एका युजरने लिहिले - या कृत्यासाठी कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. तर दुसर्‍याने युजरने लिहिले - ते लोक माणसांनाही प्राण्यांप्रमाणे वागवतात. तर तिसऱ्या युजरने - कंपनीच्या या कृतीचे वर्णन एक भयानक स्वप्न असल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार, कॅमेऱ्यात कैद झालेल्या दोघांना कंपनीने नोकरीवरून काढले आहे. तर बाकीच्या कर्मचाऱ्यांचा बोनस कापून त्यांना कंपनीने शेवटचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली होती. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई झाली, असे या निर्णयावर कंपनीने म्हटले आहे. तर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने रेड स्टार न्यूजशी संवाद साधला. यावेळी कर्मचाऱ्यांने सांगितले की, नक्कीच काही खाजगी क्षण कॅमेऱ्यात कैद केले जातील, परंतु खरे सांगायचे तर, या पॉलिसीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय