शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 17:35 IST

अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूल आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरली आहे. काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर एका आत्मघाती दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं आहे.

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूल आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरली आहे. काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर एका आत्मघाती दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं आहे. या बॉम्बस्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारनिमित्त मशिदीत नमाज पठण करण्यासाठी अनेक जण आले असताच मशिदीच्या बाहेर हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे.मशिदीच्या बाहेर 1 हजार मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांनी दिली आहे. दहशतवाद्यानं भ्याड हल्ला केल्याचं शिया मशिदीच्या पाद-यानं म्हटलं आहे. अजूनपर्यंत या दहशतवादी हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारचा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले होते. स्टेडियममध्ये टी 20 सामना सुरू असताना हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर सामना थांबवण्यात आला होता. अफगाणिस्तानचा टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, काबूलमधील क्रिकेट स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावरील चेकपोस्टवर दहशतवाद्याने हल्ला घडवून आणला होता. यामध्ये दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते.काबूलमधील स्टेडियममध्ये स्थानिक संघामध्ये टी-20 चा सामना सुरू होता. त्यावेळी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर खेळाडूंना सुरक्षित स्थानवर हलवण्यात आले. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार दहशतवादी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना हा हल्ला झाला होता.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला