अफगाणिस्तानात मदरसामध्ये बॉम्बस्फोट, 9 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: May 9, 2017 11:19 IST2017-05-09T11:05:44+5:302017-05-09T11:19:51+5:30
अफगाणिस्तानमधील एका मदरसामध्ये आज सकाळी (9 मे) बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 8 लहान मुलांसहीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानात मदरसामध्ये बॉम्बस्फोट, 9 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 9 - अफगाणिस्तानमधील एका मदरसामध्ये आज सकाळी (9 मे) बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 8 लहान मुलांसहीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. परवानमधील उलेमा काउंसिलच्या अध्यक्षाचाही यात मृत्यू झाला आहे.
परवान भागातील ही घटना आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदरसाच्या वर्गातच स्फोटकं पेरण्यात आली होती. दरम्यान, अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
परवान प्रांत अफगाणिस्तानातील अशांत परिसर असून याठिकाणी तालिबान ही दहशतवादी संघटना बरीच सक्रीय आहे. शिवाय, येथील ग्रामीण परिसरातही दहशतवादी हल्ले सुरूच असतात.
Head of Parwan Ulema Council and 8 students killed in a blast inside a Madrassa in Parwan province of Afghanistan: Reports TOLO News
— ANI (@ANI_news) May 9, 2017