बोको हराम संघटनेची ‘इसिस’शी हातमिळवणी?
By Admin | Updated: March 8, 2015 22:54 IST2015-03-08T22:54:15+5:302015-03-08T22:54:15+5:30
दहशतीच्या बळावर सत्ता स्थापन करण्याचा इराद्याने नायजेरियात हैदोस घालणाऱ्या बोको हराम या दहशतवादी संघटनेने आता ‘इस्लामिक स्टेट

बोको हराम संघटनेची ‘इसिस’शी हातमिळवणी?
मैदुगिरी : दहशतीच्या बळावर सत्ता स्थापन करण्याचा इराद्याने नायजेरियात हैदोस घालणाऱ्या बोको हराम या दहशतवादी संघटनेने आता ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या कुख्यात दहशतवादी संघटनेशी हातमिळविणी करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे.
इसिसशी हातमिळविणी करण्याचा मनसुबा बोको हरामने आपल्या टिष्ट्वटरवर जाहीर केला आहे. बोको हरामचा सर्वेसर्वा अबुबकर शेकाऊ याच्या आवाजात जारी या संदेशात बोको हरामने इसिसप्रती निष्ठा व्यक्त केली आहे. शनिवारी पोस्ट करण्यात आलेल्या या संदेशात (ध्वनिफीत) म्हटले आहे की, आम्ही खलिफा यांच्या प्रती निष्ठा व्यक्त करतो. दु:ख आणि सुखाच्या काळात आम्ही त्यांच्या शब्दाला जागणार. जगाच्या पाठीवरील मुस्लिमांनी खलिफा (इसिस नेता अबू बकर अल-बगदादी) प्रती निष्ठा राखण्याचे आम्ही आवाहन करतो.’ हा संदेश अरबी आणि फ्रेंच भाषेसोबत इंग्रजीतही भाषांतरित करण्यात आलेला आहे. तथापि, या संदेशातील आवाज अबू बकर शेकाऊ याचाच आहे का? याबाबत खात्रीलायक दुजोरा मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)