बोको हरामकडून पुन्हा रक्ताचे पाट; ७० नागरिकांची हत्या

By Admin | Updated: February 6, 2015 02:31 IST2015-02-06T02:31:32+5:302015-02-06T02:31:32+5:30

कॅमेरूनच्या सीमेवरील फोटोकोल शहरात बुधवारी बोको हरामच्या हल्लेखोरांनी किमान ७० नागरिकांना ठार मारले व मशीद पेटवून दिली.

Boko Haram again raises blood; 70 people killed | बोको हरामकडून पुन्हा रक्ताचे पाट; ७० नागरिकांची हत्या

बोको हरामकडून पुन्हा रक्ताचे पाट; ७० नागरिकांची हत्या

फोटोकोल, कॅमेरून : कॅमेरूनच्या सीमेवरील फोटोकोल शहरात बुधवारी बोको हरामच्या हल्लेखोरांनी किमान ७० नागरिकांना ठार मारले व मशीद पेटवून दिली. फोटोकोलपासून साधारणत: ५०० यार्डांवरील कॅमेरूनच्या गॅम्बोरू गावातून बोको हरामच्या जिहादींना बाहेर काढण्यासाठी चाडचे सैन्य पाठविण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला. चाडच्या सैन्याने बोको हरामचे २०० अतिरेकी ठार केल्याचे सांगितले. काही अतिरेकी पळून गेले. बोको हरामच्या प्रभाव क्षेत्रात त्यांना प्रथमच ठार मारण्यात आले आहे. या संघर्षात कॅमेरूनचे सहा सैनिकही ठार झाले आहेत.

Web Title: Boko Haram again raises blood; 70 people killed