नीसमध्ये दर पाच मीटरवर मृतदेह, अवयव आणि रक्ताचा सडा
By Admin | Updated: July 15, 2016 13:22 IST2016-07-15T11:46:01+5:302016-07-15T13:22:29+5:30
फ्रान्सच्या नीस शहरात मन सुन्न करुन टाकणारे दृश्य आहे. नीसमध्ये प्रत्येक पाच मीटरवर एक मृतदेह, अवयव आणि रक्ताचा सडा असे चित्र आहे.

नीसमध्ये दर पाच मीटरवर मृतदेह, अवयव आणि रक्ताचा सडा
ऑनलाइन लोकमत
नीस, दि. १५ - फ्रान्सच्या नीस शहरात मन सुन्न करुन टाकणारे दृश्य आहे. नीसमध्ये प्रत्येक पाच मीटरवर एक मृतदेह, अवयव आणि रक्ताचा सडा असे चित्र आहे. आतापर्यंत ८० जण या हल्ल्यात ठार झाले असून, १८ जखमींची प्रकृती गंभीर आहे.
रिसॉर्टमध्ये राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीमध्ये घुसवण्यात आलेला ट्रक हा दहशतवादी हल्लाच असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोईस ओलांद यांनी स्पष्ट केले आहे. या ट्रकमधून मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, या हल्लेखोराने जमलेल्या गर्दीला ट्रकखाली चिरडताना अंदाधुंद गोळीबारही केला होता.
राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने होणारी आतषबाजी पाहण्यासाठी येथे गर्दी जमली होती. यावेळी गर्दीमध्ये जल्लोष, उत्साहाचे वातावरण असताना अचानक १९ टन वजनाचा ट्रक अतिवेगाने गर्दीमध्ये घुसला व बेदरकारपणे समोरच्यांना उडवण्यास सुरुवात केली. सर्वत्र एकच किंकाळया ऐकू येत होत्या. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळत होता.
ट्रकमध्ये सापडलेली कागदपत्रे ३१ वर्षांच्या युवकाची असून तो फ्रेंच, टयुनिशनय नागरीक आहे. मृतांमध्ये मोठया प्रमाणावर लहान मुलांचा समावेश आहे.