विमानातून रुग्णालयाच्या छतावर फेकला मृतदेह
By Admin | Updated: April 13, 2017 14:02 IST2017-04-13T14:02:27+5:302017-04-13T14:02:27+5:30
हत्या केल्यानंतर आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात किंवा निर्जन स्थळी नेऊन टाकतात पण मेक्सिकोच्या सिनालोआ शहरात...

विमानातून रुग्णालयाच्या छतावर फेकला मृतदेह
ऑनलाइन लोकमत
सिनालोआ, दि. 13 - हत्या केल्यानंतर आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात किंवा निर्जन स्थळी नेऊन टाकतात पण मेक्सिकोच्या सिनालोआ शहरात उड्डाणवस्थेत असलेल्या विमानातून मृतदेह रुग्णालयाच्या छतावर टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिनालोआ भाग ड्रग्स तस्कराचा अड्डा आहे.
बुधवारी 7.30च्या सुमारास एल्डोराडो येथील आयएमएसएस रुग्णालयाच्या छतावर विमानातून मृतदेह टाकण्यात आला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी त्यावेळी रुग्णालयाबाहेर उभे होते. मृतदेह फेकण्यात आला त्यावेळी विमान अत्यंत कमी उंचीवरुन उड्डाण करत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या मृतदेहाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत.
सिनालोआ शहरात आणखी दोन मृतदेह सापडल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या अधिका-यांनी दिली. हे दोन मृतदेहसुद्धा त्याच विमानातून फेकण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. एल्डोराडो परिसरात शेती केली जाते. अनेकदा शेतकरी फवारणीसाठी छोटया विमानांचा वापर करतात असे तपास अधिका-यांनी सांगितले.