बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल जाहीर

By Admin | Updated: October 13, 2016 18:09 IST2016-10-13T17:53:11+5:302016-10-13T18:09:26+5:30

अमेरिकन गायक बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Bob Dillon releases Nobel in literature | बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल जाहीर

बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल जाहीर

ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. 13 - अमेरिकन गायक बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉब डिलन यांनी अमेरिकी गायन संस्कृतीत नवे काव्य निर्माण केले असून, त्यांच्या त्या काव्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे.

बॉब डिलन हे 75 वर्षांचे असून, 1941साली त्यांचा जन्म रॉबर्ट अलेन झिमरमनमध्ये झाला. डिलन यांनी मिनेसोटा इथल्या कॉफी हाऊसमधून 1959साली संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 1960साली त्याच्या उत्कृष्ट गायन शैलीनं ते प्रसिद्धीच्या झोतात आले.  'ब्लोविन इन ड विंड अँड द टाइम्स दे आर चेंजिंग' या त्यांच्या गाण्यानं मानवाधिकार संघटना आणि युद्ध विरोधी संघटनांमधील यादवी संघर्ष शमवण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावली आहे.

डिलन यांनी पारंपरिक संगीतासोबतच अन्य प्रकारच्या संगीतातही अनेक प्रयोग केले आणि ते श्रोतांच्या पसंतीलाही उतरले. पहिल्यांदाच एका गीतकाराला त्याच्या गाण्यासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. 

Web Title: Bob Dillon releases Nobel in literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.