४५० प्रवाशांसह बोट बुडाली

By Admin | Updated: June 3, 2015 01:25 IST2015-06-03T01:25:33+5:302015-06-03T01:25:33+5:30

चीनमधील यांगत्से नदीत वादळामुळे ४५८ प्रवाशांसह जहाज बुडाले असून, यात बहुतांश वयोवृद्ध लोक होते. चीनच्या हुबेई प्रांतात सोमवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर

Boats with 450 passengers lost | ४५० प्रवाशांसह बोट बुडाली

४५० प्रवाशांसह बोट बुडाली

बीजिंग : चीनमधील यांगत्से नदीत वादळामुळे ४५८ प्रवाशांसह जहाज बुडाले असून, यात बहुतांश वयोवृद्ध लोक होते. चीनच्या हुबेई प्रांतात सोमवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर मदत कार्यकर्ते दिवसभर बेपत्ता लोकांचा शोध घेत होते. किमान ५ जण या अपघातात मरण पावले असून शेकडो बेपत्ता आहेत. चीनमधील सर्वात वाईट नौका अपघातांपैकी हा अपघात आहे.
ईस्टर्न स्टार शिप असे अपघातग्रस्त जहाजाचे नाव असून, ते चार मजली होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी १.१५ वाजता हे जहाज नानजिंग येथून निघाले, ते चोंगकिंग येथे नदीच्या वरच्या बाजूला पोहोचणार होते. जियान्ली येथे रात्री वादळी हवेत सापडून हे जहाज एक वा दोन मिनिटात बुडाले. जहाजाचा कॅप्टन या दुर्दैवी अपघातातून वाचला असून, त्याने ही माहिती दिली. जहाजाचा कॅप्टन व मुख्य अभियंता यांना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत १४ जणांची सुखरूप सुटका झाली असून, पाच मृतदेह हाती लागले आहेत. ४३९ जण बेपत्ता आहेत. चीनची ही नदी ६३०० कि.मी. लांब आहे.
अखेरचा प्रयत्न म्हणून आॅक्सिजन सोडणार
अखेरचा प्रयत्न म्हणून चिनी सरकारने बुडालेल्या जहाजात आॅक्सिजन सोडावा असे आदेश दिले आहेत. जहाजात अडकलेले जिवंत लोक सुखरूप बाहेर काढता येतील अशी आशा यामुळे निर्माण झाली आहे. सरकारी टीव्ही वाहिनीवर जहाजाचे उलटलेले धूड दाखविण्यात आले. मदत कार्यकर्ते जहाजावर पाणी नसलेल्या भागात उभे राहून आतून ठोकलेला आवाज ऐकू येतो काय हे पाहत आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्टेट कौन्सिलच्या सदस्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पंतप्रधान ली केकियांग घटनास्थळी रवाना झाले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Boats with 450 passengers lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.