शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून चीनची नाकेबंदी; एमआरआय, अल्ट्रासोनिकसारखी उपकरणे जपानमधून आयात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 06:02 IST

कोरोनानंतर भारतात चिनी वैद्यकीय उपकरणांची आयात ५७ टक्क्यांनी वाढली आहे.

नवी दिल्ली : भारताने वैद्यकीय उपकरणांसाठीचे चीनवरील अवलंबित्व कमी करून ती जपानमधून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकीकडे चिनी कंपन्यांचे मोठे नुकसान होईल तर दुसरीकडे भारताचा विश्वासू भागीदार असलेल्या जपानच्या कंपन्यांना बाजारपेठेत प्रवेशाची संधी मिळेल. याचा सामान्य रुग्णांनाही फायदा होईल, असे केंद्राला वाटते. कारण चिनी उपकरणे परवडणारी असली तरी दर्जाच्या बाबतीत ती जपानी उपकरणांच्या जवळपासही पोहोचत नाहीत.

कोरोनानंतर भारतात चिनी वैद्यकीय उपकरणांची आयात ५७ टक्क्यांनी वाढली आहे. मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते,  २०२०-२१ मध्ये चीनमधून वैद्यकीय उपकरणांची आयात २,६८१ कोटी रुपयांवरून ४,२२३ कोटी रुपये झाली आहे. जपानने भारताच्या वैद्यकीय उपकरणाच्या गरजा पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. 

दरवर्षी ७,३८० कोटींची आयात

  • वैद्यकीय तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते भारत, अमेरिका, ब्रिटन यांसारखे सर्व प्रमुख देश प्रगत वैद्यकीय उपकरणांसाठी चीन, जपान व सिंगापूरवर अवलंबून आहेत. 
  • चीन जगात सर्वाधिक उपकरणे पाठवतो व जपान जगाला सर्वात आधुनिक उपकरणे पुरवतो. भारत सध्या जपानकडून दरवर्षी १,०६६ कोटी रुपयांची किमतीची उपकरणे आयात करत आहे. ७,३८० कोटी रुपये किमतीची हीच उपकरणे चीनमधून येत आहेत. म्हणजे जपानच्या तुलनेत  चीनमधून ७ पट अधिक आयात होते. 
  • पुढील पाच वर्षांत चीनकडून १,०६६ कोटी रुपयांची तर जपानमधून ७,३८० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे आयात करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे जपानसोबतच्या द्विपक्षीय व्यापारासाठी चीनच्या तुलनेत सीमाशुल्क कमी आहे.

चीन ठरला जगात अप्रियचीनने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले होते. तैवानवर चीनने आक्रमण केल्यास त्यात अमेरिका हस्तक्षेप करेल, असा इशारा जो बायडेन सरकारने दिला होता. कोरोना साथीचा उगम चीनमधील वुहान शहरातून झाल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला होता. अमेरिकेत चीनचे बलून पाडण्यात आले. या बलूनद्वारे चीनने हेरगिरी केल्याचा अमेरिकेला संशय होता. गेल्या तीन वर्षांत अशा अनेक अप्रिय घटना घडल्यामुळे चीनवर जगातील अनेक देश नाराज आहेत. 

चीनवर अंकुश गरजेचारायसीना डॉयलागदरम्यान चीनविरोधात आवाज उठवला गेला. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट म्हणाले की, चीन व्यापाराला शस्त्र बनवत आहे. त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्याला आर्थिक इजा पोहोचविणे आवश्यक आहे. या बैठकीनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी जपानसोबतची पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी जपानी अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली.

२०२३ साठी ५% विकासदराचे लक्ष्यबीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पाच वर्षांच्या तिसऱ्या कार्यकाळाला प्रारंभ झाला आहे. त्या देशाने २०२३ या वर्षात पाच टक्के विकासदर गाठण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, तसेच आपल्या संरक्षण खर्चात गेल्या वर्षीपेक्षा ७.२ टक्के वाढ केली आहे. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInvestmentगुंतवणूक