तुर्की विमानतळावर स्फोट; महिला जखमी
By Admin | Updated: December 24, 2015 00:03 IST2015-12-24T00:03:05+5:302015-12-24T00:03:05+5:30
तुर्कस्तानची राजधानी इस्तम्बुलमधील विमानतळावर बुधवारी बॉम्बस्फोट झाला. यात स्वच्छतेचे काम करणारी महिला ठार झाली

तुर्की विमानतळावर स्फोट; महिला जखमी
इस्तम्बुल : तुर्कस्तानची राजधानी इस्तम्बुलमधील विमानतळावर बुधवारी बॉम्बस्फोट झाला. यात स्वच्छतेचे काम करणारी महिला ठार झाली. हल्ल्याच्या शक्यतेने तुर्कस्तानात अतिसतर्कता बाळगली जात असतानाच ही घटना घडली.
अज्ञात वस्तूचा हा स्फोट टर्मिनल इमारतीच्या जवळ झाला. या इमारतीजवळ प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी विमाने उभी करण्यात येतात. टर्मिनलजवळ उभ्या असलेल्या पीगासुस या खासगी विमान कंपनीच्या विमानाजवळ हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी विमानात किंवा आसपास प्रवासी नव्हते. अपघातात जखमी झालेली व्यक्तीही स्वच्छता कर्मचारी आहे. (वृत्तसंस्था)