शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘H1B’ व्हिसा कार्यक्रम बंद करण्यासाठी विधेयक; कॉर्पोरेट गैरवापर, परदेशी मजुरांवर अवलंबनाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 08:49 IST

एच-१बी व्हिसाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अमेरिकेत रोजगारासाठी व वास्तव्यासाठी जातात.

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकी काँग्रेसचे फ्लोरिडा येथील रिपब्लिकन प्रतिनिधी (खासदार) ग्रेग स्ट्यूब यांनी ‘एच-१बी’ व्हिसा कार्यक्रम संपुष्टात आणण्यासाठी विधेयक सादर केले आहे. याचा सतत गैरवापर करून अमेरिकेत स्वस्त परदेशी कामगार-कर्मचारी आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.स्ट्युब यांनी ‘एन्डिंग एक्स्प्लॉइटेटिव्ह इम्पोर्टेड लेबर एक्झेम्प्शन्स ॲक्ट’ किंवा ‘एक्झाइल ॲक्ट’ हे विधेयक मांडले. याद्वारे कायम वास्तव्याचे स्थलांतर तसेच नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करून एच-१बी व्हिसा कार्यक्रम समाप्त करण्याचा प्रस्ताव आहे.

ही आहे स्ट्यूब यांची भूमिकाअमेरिकी नागरिकांच्या कल्याणापेक्षा परदेशी मजुरांना प्राधान्य देणे हे देशाची मूल्ये आणि राष्ट्रीय हितांवर आघात करणारे आहे, असे स्ट्युब यांनी म्हटले आहे. या व्हिसा कार्यक्रमामुळे अमेरिकी कामगार आणि तरुण विस्थापित होत आहेत. हा कार्यक्रम अमेरिकी कार्यक्षमतेची किंमत मोजून परदेशी प्रतिस्पर्ध्यांना लाभ देत असल्याचे स्ट्यूब यांचे म्हणणे आहे.

भारतीयच प्रमुख लक्ष्यएच-१बी व्हिसाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अमेरिकेत रोजगारासाठी व वास्तव्यासाठी जातात. ट्रम्प प्रशासनाने याच पार्श्वभूमीवर कायदेशीर आणि बेकायदेशीर स्थलांतरावर कठोर कारवाई तीव्र करीत एच-१बी व्हिसांवर नवे कठोर निर्बंध लागू केले आहेत.

एच-१बी व्हिसा कार्यक्रमाचा गैरवापर राष्ट्रीय सुरक्षेस धोका असल्याचे सांगत ट्रम्प यांनी गेल्या वर्षी नव्या व्हिसांवर १ लाख डॉलर शुल्क आकारण्याचा आदेश दिला होता. या निर्णयामुळे भारतीय व्यावसायिकांमध्ये मोठी घबराट, संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. एच-१बी व्हिसा मिळवणाऱ्यांपैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक लाभार्थी भारतीय किंवा चिनी नागरिक आहेत. त्यात तरुण कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bill to end H1B visa program: Allegations of corporate abuse.

Web Summary : US Congressman Greg Steube introduces bill to end H1B visa program, alleging corporate misuse and displacement of American workers. The 'EXILE Act' targets foreign labor preference, impacting mainly Indian and Chinese professionals seeking US employment.
टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत